कुत्र्याच्या तावडीतून सुटका करून जखमी माकडाला जीवदान

गोंदिया : नजिकच्या कारंजा येथील हिमगिरी कॉलनीत माकडांची टोळी दाखल झाली. दरम्यान एका माकडावर कुत्र्यांनी हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी त्या माकडाची सुटका करून त्याला जीवदान दिले. विशेष म्हणजे, कुत्र्यांचा हल्ल्यात माकड गंभीररित्या जखमी झाला होता.नागरिकांनी पशुवैद्यकीय अधिकार्याला पाचारण करून त्याच्यावर औषधोपचार करवून घेतला. तसेच त्याची निगा राखली जात आहे.हिमगिरी कॉलनीत माकडाच्या टोळीवर कुत्र्यांनी हल्लाबोल केला. दरम्यान भरकटलेला एक माकड कुत्र्यांच्या तावडीत सापडला. नागरिकांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी कुत्र्यांना हाकलून लावले. तसेच गंभीर जखमी झालेल्या माकडाची स्थिती पाहून पशुवैद्यकीय अधिकार्याला पाचारण करण्यात आले. डॉ.लखन पारधी यांनी त्वरित त्या जखमी माकडावर उपचार करून त्याला औषधोपचार केला. दरम्यान त्या माकडाला तीर्थराज टेंभुर्णीकर यांच्या देखरेखीत ठेवण्यात आले असून त्याची काळजी घेतली जात आहे.