LatestNewsगोंदिया

तहसील कार्यालयावर १९ सप्टेंबरला मोर्चा

गोरेगाव : भारतीय कम्युनिस्ट पार्टी गोरेगाव तालुका कौन्सिलची सभा २६ ऑगस्ट रोजी हिरापुर या ठिकाणी चरनदास भावे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत भारतीय कम्युनिस्ट पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य हौसलाल रहांगडाले, जिल्हा सहसचिव परेश दुरूगवार, तालुका सचिव गुनवतराव नाईक, सहसचिव दुलीचंद कावडे यांनी मार्गदर्शन केले. सभेत पक्षाचे सदस्य ऊपस्थीत होते.या सभेत विविध प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान भुमीहिन शेतमजूर याणा वन हक्क जमीन चे पट्टे दया, वृद्ध काळ श्रावण बाळ पेन्शन योजनाची थकीत रक्कम द्या, रेशन कार्ड तैयार करून दया, आवास योजना, मनरेगाची थकित किस्त द्या आदि मागण्यांना घेवून १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत बाबुलाल शहारे, नारायण गजघाट, भोलाराम मरस्कोल्हे, डिलेश्वर मौजे आदी उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *