environmentally friendly: पर्यावरण पूरक श्रीकृष्ण मूर्ती
विसर्जनग्रामपंचायत सिरेगावबांध अंतर्गत राबविण्यात आलेला नाविन्यपूर्ण उपक्रम
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील ग्रामपंचायत सिरेगावबांध च्या वतीने पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन कुत्रिम रित्या श्रीकृष्ण मूर्तीचे विसर्जन करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत सिरेगावबांध सहभाग नोंदवून उपक्रमाला यशस्वी करण्याकरिता गावातील नागरिकांनी तलाव,बोळी व नाल्यांवर विसर्जन न करता ग्रामपंचायत तर्फे तयार केलेल्या कुत्रिम विसर्जन स्थळामध्ये दिनांक १८ ऑगस्ट २०२५ ला सायंकाळी ७.३० वा. मूर्ती विसर्जन केले. पर्यावरण पुरक विसर्जन केल्याने पाण्याचे प्रदूषण टाळते प्लास्टिक आणि इतर हानीकारक वस्तू पाण्यात विसर्जन न केल्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी होते. जलचचरांवर आणि त्यांच्या अधिवासावर होणार परिणाम कमी होतो. तसेच रासायनिक रंग आणि साहित्याचा वापर तळल्यास प्रदूषण कमी होते. विविध रोगांचा प्रादुर्भाव बळावला असतांना मानवी आरोग्य रक्षणाची गरज आहे. कुत्रिम विसर्जन स्थळात विसर्जित मूर्ती पासून तयार झालेला निर्माल्य खत हा ग्रामपंचायतने लावलेल्या झाडांना पुरविल्या जाते. व मूर्ती कारांना मूर्ती बनविण्यास पुरवठा केला जाते. त्यामुळे त्या निर्माल्याचा पुनर्वापर केला जातो. माझी वसुंधरा ६.० अंतर्गत कार्बन उत्सर्जन कमी करणे. या दिशेने ग्रा.पं.सिरेगावबांध ची मोठ्या प्रमाणात वाटचाल करीत आहे. सदर कार्यक्रमा प्रसंगी गावाच्या सरपंच सौ.सागरताई चिमणकर, इंजि.हेमकृष्ण संग्रामे उपसरपंच, एल.एन.बन्सोड ग्रामपंचायत अधिकारी, यशवंत कुंभरे ग्रा.पं.सदस्य,गणेश मरस्कोल्हे ग्रा.पं.सदस्य,.चोपराम चाचेरे ग्रा.पं.सदस्य, सौ.छाया गहाणे ग्रा.पं.सदस्या, श्रीमती.अमिता खोब्रागडे ग्रा.पं.सदस्या, सौ.तिलोत्तमा कापगते ग्रा.पं.सदस्या, सौ.ज्योत्सना मरस्कोल्हे ग्रा.पं.सदस्या, सौ.लता सयाम ग्रा.पं.सदस्या, चामेश्वर गहाणे तंटा.मुक्त समिती अध्यक्ष, भुमिता गहाणे पोलीस पाटील, श्री.गंगुबाई कापगते ICRP, सौ.रेखा घोडाम आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी शामराव उईके ग्रा.पं.परिचर, ईश्वरदास घोडाम जलसुरक्षक, मनराज पचारे संगणक परिचालक, अरविंद कापगते रोजगार सहाय्यक. घनशाम कापगते मुख्यमत्री युवा प्रशिक्षनार्थी, यशवंत डोंगरवर, इंदिरा मेश्राम, यशोधरा डोंगरवार, सरिता मेश्राम, छाया सयाम तसेच समस्त गावकरी यांच्या उपस्थितीत पर्यावरण पूरक मूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला.

