LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे : अध्यक्ष भेंडारकर

महागाव येथे तालुका अटल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन

नवेगावबांध : अभ्यासाचे कारण पुढे करून मुलांना खेळापासून किंवा स्पर्धेपासून दूर ठेवू नका. उलट, अशा उपक्रमांमुळे मुलांचे मन प्रसन्न राहते, एकाग्रता वाढते,त्यांना नियोजनाची सवय लागते. क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमातून ‘मी’ पणा सोडून‘आपण’ या भावनेने समाजाशी जोडले जाण्याचे संस्कार सांस्कृतिक स्पर्धातून मुलांवर होतात. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले. ते अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव येथे तालुकास्तरीय जिल्हा अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी लायकराम भेंडारकर बोलत होते.महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते. कार्यक्रमला क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले, जि.प.उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती सुरेश हर्षे, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, पंचायत समिती सभापती आम्रपाली डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते, जि.प.जयश्री देशमुख व कविता कापगते, पं.स.सदस्य होमराज पुस्तोडे, प्रमोद लांडगे, नाजूक कुंभरे, सविता कोडापे, भाग्यश्री सयाम, घनश्याम धामट, नूतन सोनवाणे, कुंदा लोगडे, शालिनी डोंगरवार, पुष्पलता दृगकर, ख.वि. उपाध्यक्ष विजय कापगते, माजी जि.प.सदस्य रामदास कोहाडकर, गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे, विस्तार अधिकारी बी. डब्ल्यू. भानारकर, सरपंच प्रभाकर कोवे, उपसरपंच सुरेश पुस्तोडे, आर.के.देशमुख, विनोद डोंगरवार, हंसराज गोटाफोडे, भागवत झोडे, एच.एम.घोरमोडे, लक्ष्मीकांत नाकाडे, नाजुक लसुंते, स्वप्नील उके, छाया बोरकर, अनिल देशमुख, रसिका रामटेके, सुंदरा कोहाटकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अनिल राणे, छगन साखरे, विजय मेश्राम, गट समन्वयक सत्यवान शहारे, हंसराज मेश्राम, ईश्वर आत्रामे, प्रीतम रामटेके, प्रभाकर मेश्राम, अरुण हातझाडे, त्र्यंबक झोडे, गोविंद वाघाडे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *