LatestNewsगोंदियाविदर्भ

Mosquito : डास उत्पत्ती स्थानकांमध्ये गप्पी मासे सोडण्याकरिता जिल्हा एकवटला

जनजागृती आली फळाला : किटकजन्य रोग नियंत्रणाकरीता संपुर्ण जिल्ह्यात 1146 ठिकाणी सोडण्यात आले गप्पी मासे
गोंदिया :  जिल्ह्यात मागील आठवड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने पावसाचे पाणी सर्वत्र साचलेले दिसत आहे. त्यामुळे डासोत्पती स्थानात वाढ होण्याची शक्यता बघता राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयात किटकजन्य आजार जसे हिवताप,डेंग्यू,चिकनगुनिया,चंडी पुरा,जे.ई.व हत्तीरोग इत्यादी आजाराबाबत वाढते रुग्णांची शक्यता बघता जिल्हा आरोग्य प्रशासनाने अलर्ट मोडवर जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांच्या संकल्पनेतून दि.2 ऑगस्ट रोजी संपूर्ण जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणार्या कार्यक्षेत्रातील गावोगावी जिवशास्त्रीय उपाययोजनेतुन उपलब्ध तात्पुरते व कायमस्वरुपी डासोत्पती स्थानकात गप्पी मासे सोडणे दिवस 2 ऑगस्ट रोजी साजरा करण्याचे नियोजन केले होते व त्यानूसार प्रत्येक गावातील कायमस्वरुपी व तात्पुरत्या डासउत्पत्ती स्थानांमध्ये आरोग्य कर्मचारी,आरोग्य सेविका,आशा कार्यकर्ती यांच्या सोबतीने गाव पातळीवरील लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,सरपंच, ग्राम पंचायत सदस्य,प्रतिष्टीत नागरिक यांच्या सहभागातून डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.या जनजागरण माहिमेमध्ये गाव तसेच शहर पातळीवर डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडून गप्पी माशांचे कीटकजन्य आजार नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने त्याचे महत्व व प्रात्यक्षीक आरोग्य विभागामार्फत जनतेला पटवून देण्यात आले.यावेळी डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे,खड्ड्यांमध्ये माती टाकणे, नाली वाहती करणे,कोरडा दिवस पाळणे,  नेहमी पाणी जमा राहत असेल अशा ठिकाणी गप्पी मासे सोडणे,आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत डास अळी सर्वेक्षण,जलदताप सर्वेक्षण,अ‍ॅबेटिंग,डी-लार्वा, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवणे, तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना विषयी आरोग्य शिक्षण देणे,गट सभा घेणे इत्यादी विविध अशा उपाययोजना या मोहिमेमध्ये करण्यात आले.
लोकसहभागातुन हा दिवस साजरा करण्याचा नाविन्यपुर्वक उपक्रम ग्राम पंचायती मार्फत राबविल्यास हिवतापाचा प्रादुर्भाव कमी होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी म्हटले आहे.यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले गप्पी मासे पैदास केंद्रात असलेले गप्पी मासे वितरण करण्यात आले. गप्पी मासे हे डास अळी भक्षक असल्यामूळे या मोहिमेत कायमस्वरुपी व तात्पूरत्या  डासोत्पत्ती स्थानामध्ये गप्पी मासे सोडण्याची संकल्पना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी अमलात आणुन तब्बल 1146 ठिकाणांमध्ये लोकसह्भागातुन गप्पी मासे सोडण्यात आल्याची माहीती त्यांनी ह्याप्रसंगी दिली आहे.  लोकांमध्ये किटकजन्य आजाराविषयी जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनाची अंमलबजावणी करणे व जनतेच्या सक्रिय सहभाग प्राप्त करून घेणे हा या मागचा मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी म्हटले आहे. डासांची पैदास पाण्यात होत असल्याने अशा डबकी, गटारे इत्यादी जागांमध्ये पाण्याचा निचरा केल्याने व मातीने अशा जागा बुजून टाकल्यास डासांची पैदास होत नाही या उपायांमध्ये स्त्रोत नष्ट करणे असे म्हणतात.डास उत्पत्ती नष्ट करणे हे फार महत्वाचे असते. डासांचे नियंत्रण करताना डासांची पैदास होणारी स्थाने उदाहरणार्थ उघडी गटारे,डबकी आणि साचलेल्या पाणी हे वाहते करणे व शक्य नसल्यास गप्पी मासे डबक्यात किंवा वापरात नसल्या विहिरीत सोडता येतात.
………………………….
गप्पी मासे पाळण्याचे फायदे :-
गप्पी मासे पाण्यातील डासांची डासअळी लारव्हा खाऊन टाकतात ज्याने घरातील डास कमी होतील.
बाजारातील रासायनिक उत्पादके घेण्यापेक्षा हा स्वस्त आणि सुरक्षित उपाय आहे.
गप्पी माश्यांना टाकीमध्ये किंवा ज्या कोणत्या पाण्याच्या ठिकाणी ठेवाल तिकडे ऑक्सिजन युनिटची गरज नसते.
त्यांचा आहार इतर माश्यांपेक्षा कमी असतो.
गप्पी मासे अंडी न घालता पिल्ले देतात त्यामुळे त्यांचा जगण्याचा दर जास्त असतो.
 ……………………………..
लोकसहभागातुन डासोत्पती स्थांनामध्ये गप्पी मासे सोडल्यांने निश्चितच डास अळी कमी होण्यास मदत होणार आहे.डासांची पैदास नियंत्रीत होऊन किटकजन्य आजार कमी होऊन पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.हि जैविक उपाय योजना स्वस्त् व चांगले परिणाम देते.नियमित पणे प्रत्येक गावात लोकसहभागातुन अमंलबजावनी केल्यास किटकजन्य आजार नियंत्रित होण्यास मदत होईल.

  – डॉ. विनोद चव्हाण , जिल्हा हिवताप अधिकारी गोंदिया

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *