LatestNewsगोंदिया

Sadak arjuni Rakshabandhan: सरपंच हर्ष मोदी यांच्या रक्षाबंधन कार्यक्रमाला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सडक अर्जुनी : सौंदड ग्रामपंचायतीचे सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी सौंदळ येथे विविध प्रभागात रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये शेकडो महिलांनी सरपंच हर्ष विनोद कुमार मोदी यांना राख्या बांधून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधनाचा कार्यक्रम सौंदड गावात 16 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या संकल्पनेतून “माझा भाऊ सरपंच” हा अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ६०० हून अधिक महिलांनी वैयक्तिकरित्या सरपंच हर्ष मोदी यांना राखी बांधून त्यांच्यावर असलेले प्रेम, विश्वास आणि आपुलकी व्यक्त केली. गावातील प्रत्येक वार्डात हा सोहळा पार पडला आणि प्रत्येक ठिकाणी महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. गावातील दुर्गा मंदिर वार्ड वार्ड क्र.1 , शिव मंदिर वार्ड 2, हनुमान मंदिर वार्ड 3 , संविधान चौक वार्ड 4, गणेश मंदिर वार्ड 5 आदी ठिकाणी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. रक्षाबंधनाचा हा अनोखा सोहळा केवळ बंधुभावाचा नव्हे तर ग्रामविकास, ऐक्य आणि नेतृत्वावर असलेल्या निष्ठेचा उत्सव ठरला.गावातील महिलांनी एकमुखाने सांगितले – “हर्ष मोदी हे फक्त आमचे सरपंच नाहीत, तर आमच्या सर्वांच्या हक्कांचे आणि सुरक्षिततेचे खरे भाऊ आहेत.या उपक्रमातून हर्ष मोदी यांनी गावकऱ्यांशी असलेले आपुलकीचे नाते अधिक दृढ केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *