Breaking news: धक्कादायक 🚨 जि.प. लोहारा शाळेचे स्लैब कोसळले!
ध्वजारोहण सुरू असतांना घडली घटना : पं.स. देवरी अंतर्गत जिप केंद्र शाळेतील घटना, विद्यार्थ्यांची व उपस्थितांची जिवितहानी आणि मोठा अनर्थ टळला
देवरी : पं.स. देवरी अंतर्गत जिप केंद्र लोहारा येथे आज १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम सुरु असतांना वर्ग खोली इमारतीचे समोरील स्लैब कोसळले. यावेळी मुख्याध्यापक के. बी. गभने यांच्या तत्परतेने विद्यार्थ्यांची व उपस्थितांची जिवितहानी आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेने जिल्हा परिषदेच्या शाळा सुरक्षीत नसल्याचे चर्चा सुरु झाली आहे.

आझादी का अमृत महोत्सव सुरू असतांना देशाचा भवितव्य असुरक्षित असल्याचे देवरी तालुक्यातील जिप शाळा लोहारा येथे सिद्ध झाले आहे. घर घर तिरंगा अभियान अंतर्गत जि.प केंद्र प्राथमिक शाळा लोहारा पंस देवरी येथील प्रांगणात विद्यार्थी, शिक्षक तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद टेंभूरकर, माता पालक समिती अध्यक्षा प्रिती टेंभूरकर इतर सर्व व्यवस्थापनेचे सदस्य तसेच मोहनसिंग पवार ध्वजारोहण कार्यक्रमाला सकाळ सत्रात उपस्थित होते. या शाळेचे मुख्याध्यापक पदावर रुजू झाल्यापासून एक वर्षात शिक्षणाधिकारी गोंदिया, बांधकाम सभापती गोंदिया, गटशिक्षणाधिकारी देवरी , ग्रामपंचायत कार्यालय लोहारा क्षेत्राचे खासदार, आमगांव देवरी क्षेत्राचे आमदार या क्षेत्राच्या जि.प. सदस्य यांना वेळोवेळी पत्र दिलेले आहे. परंतू इमारतीचे स्लैब कोसळेपर्यंत कोणतीही इमारत बांधकाम झालेले नाही. यावरून स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी शालेय विद्यार्थ्यांसाठी किती सक्रिय आहेत.
याची प्रचिती बघावयास मिळाली.या शाळेची स्थापना 1949 मधे झाली असून इमारतीची डागडुजी करुन आतापर्यंत या धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थी शिक्षण घेत होते. मुख्याध्यापकानी या शाळेतील 3 धोकादायक इमारतीमध्ये विद्यार्थी बसविणे बंद केलेले आहे.पुन्हा उर्वरीत 3 इमारत जीर्ण असून त्या इमारतीचा तोल केव्हाही जावू शकतो यामुळे शासनाने या बाबीचा विचार करता 1949 पासून डागडूजी केलेल्या इमारती पाडून अविलंब बांधकाम करण्यात यावे अशी विनंती ग्रामवासी लोहारा यांनी केली आहे.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद टेंभूरकर , माता पालक संघ अध्यक्ष व इतर सदस्यांनी बांधकामांची मागणी केलेले आहे. आपत्कालीन परिस्थितीत डागडूजी करुन मुलांच्या जिवाशी खेळण्यात अर्थ नाही तसेच मागणी पूर्ण न झाल्यास सर्व विद्यार्थीसह जि.प.गोंदिया कार्यालयात विद्यार्थ्यांचा मोर्चा वळविण्याचे भाकीत केले आहे.

