LatestNewsUncategorizedमहाराष्ट्रविदर्भ

Har Ghar Tiranga 2025 : 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता”अभियान

 जिल्हाभरात शुभारंभ, दररोज राबविणार विविध उपक्रम
भंडारा :
या वर्षीच्या 79 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग या संकल्पनेसह जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक विशेष स्वच्छता व जनजागृती मोहीम ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करणे आणि समाजात शाश्वत स्वच्छता सवयी बिंबविणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग होऊन यशस्वी करावी असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे. हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग या संकल्पनेसह आयोजित अभियानांतर्गत दररोज विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी खास उद्दिष्ट ठेऊन ग्रामस्थ, विद्यार्थी, स्वयंसहायता समूह, विविध संस्था, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचा डॉ सहभाग राहणार आहे.
……………….
मोहिमेचा शुभारंभ 
 जिल्हा, तालुका व ग्राम पंचायतस्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते अभियानाचा औपचारिक शुभारंभ होईल. गावातील प्रमुख प्रवेशद्वार, शाळा परिसर, अंगणवाडी येथे स्वच्छता करून मोहीमेचा श्रीगणेशा करण्यात येईल. शुभारंभाच्या दिवशी नागरिक, विद्यार्थ्यांना स्वच्छ सुजल गावाची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे.
…………………….
 9 ते 11 ऑगस्ट : सार्वजनिक स्वच्छता मोहीम
सार्वजनिक शौचालये, कचराकुंड्या, प्लास्टिक संकलन केंद्र, रस्ते, नाल्या, अंगणवाडी व शाळा परिसर इ. ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित करून मोहिमेमध्ये  स्वयंसहायता बचतगट, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, शालेय विद्यार्थी, युवक, नागरिकांचा यांचा सहभाग घेण्यात येईल. प्लास्टिक कचरा संकलन व व्यवस्थापनासंबंधी तपासणी करण्यात येणार आहे. आझादी का श्रमदानांतर्गत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता  व सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याची गळती शोधणे व थांबविण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. गावातील युवक, विद्यार्थ्यांची स्वच्छता रॅली काढली जाईल. तसेच वैयक्तिक स्तरावर रांगोळी काढणे व स्वच्छता घटकांची रंगरंगोटी करण्यात येईल.
……………………………
 12 ऑगस्ट : WaSH सुविधा स्वच्छता दिन
जल जीवन मिशनच्या घटकांतील पाणीपुरवठा स्थळांची व नळ जोडण्या, टाक्या, स्रोत, वीज पंप हाउस यांची रंगकाम व स्वच्छता करण्यात येईल. देशभतीपर थीमसह पाणी व स्वच्छता स्थळांचे रंगकाम व सजावट करण्यात येईल. वॉश (WaSH) स्थळांवर तिरंगी धागे बांधणे.
 13 ऑगस्ट : स्वच्छता संवाद आणि जनजागृती दिन
 कचरा व्यवस्थापन, शौचालय देखभाल दुरूस्ती, जल संवर्धन, भूजल पूनर्भरण, जलस्रोत संरक्षण, एकल प्लास्टिक वापर  टाळणे बाबत व्यापक जनजागती करण्यात येईल. स्वच्छतेबाबत आव्हाण व उपाययोजना या विषयावर सभा व चर्चा आयोजित केली जाईल.
 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाची तयारी
 ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक, बाजारपेठा, शाळा व वॉश स्थळांची स्वच्छता सजावट आणि ध्वजारोहणासाठी ठिकाण निश्चित करणे.”हर घर तिरंगा” अभियानांतर्गत घरोघरी झेंडा लावण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
 15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन साजरा करणे.
 ग्रामपंचायत कार्यालय, शाळा व शासकिय कार्यालयावर ध्वाजारोहणासोबतच जलस्रोत व स्वच्छता स्थळे, हर घर तिरंगा मोहिमेतंर्गत वैयक्तिक कुटूंब स्तरावर ध्वाजारोहण करण्यासोबतच “स्वच्छता शपथ”व स्वयंसेवकांचा सन्मान करण्यात येईल. या मोहिमेमुळे ग्रामीण भागात स्वच्छतेबाबतची नागरिकांच्या सहभागातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन “हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता” मोहिम यशस्वी करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *