श्रमिक पत्रकार संघाचा टिळक गौरव पुरस्कार वितरण सोहळा १५ ऑगस्टला
गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आणि उत्कृष्ट सामाजिक व कृषी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याचा सत्कार
पालकमंत्री यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण
गोंदिया : श्रमिक पत्रकार संघाचा टिळक गौरव पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार १५ ऑगस्ट २०२५ रोजी गोंदिया येथील राईस मीलर्स असोसिएशनच्या सभागृहात दुपारी १२:०० वाजता आयोजित करण्यात आलेला आहे. श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती निमित्त ” टिळक गौरव पुरस्कार” आणि पत्रकारिता क्षेत्रात मागील वर्षी उत्कृष्ट कार्याबद्दल विविध पुरस्कार तसेच एस.एस.सी. (१० वी) आणि एच. एस.एस.सी (१२ वी) मधील जिल्हयात टॉपर आलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय असे गुणवंत विद्यार्थी तसेच गोंदिया क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाच्या सेवाभावी संस्था, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे, तसेच कृषी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे यांचा सत्कार समारंभ या प्रसंगी आयोजित करण्यात आलेला आहे.श्रमिक पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारात श्रमिक पत्रकार संघ टिळक गौरव पुरस्कार सा. मोहरा म टाइम्स न्युज चे संपादक विश्वास बोंबोर्डे यांना देण्यात येणार आहे. या सोबतच स्व. मनोहरभाई पटेल स्मृती संपादकीय पुरस्कार, स्व. रामकिशोर कटकवार उत्कृष्ट वृत्तवाहिनी पुरस्कार, स्व. स्वातंत्र्य संग्राम सैनिक हिरालाल जैन उत्कृष्ट विकास वार्ता पुरस्कार, स्व. संतोष अग्रवाल स्मृती शोध वार्ता पुरस्कार, कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था सामाजिक पुरस्कार, माजी आमदार खोमेशभाऊ रहांगडाले यांच्याकडून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट पुरस्कार, श्रमिक पत्रकार संघ उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार, उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार तसेच सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटी लिमिटेड गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आदि चे वितरण गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री व गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले, खासदार प्रफुल पटेल, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीमती दीपाताई चंद्रिकापुरे, समाजकल्याण सभापती श्रीमती रजनी कुंभरे, बालकल्याण सभापती श्रीमती पोर्णिमाताई ढेंगे, माजी विधान परिषद सदस्य राजेंद्र जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, माजी आमदार शेषराव कोरटे, माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम, जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, नगर परिषद मुख्याधिकारी संदीप बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी श्वेता राऊत पोतूडे, राईस मीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल , महेश अग्रवाल आदि प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष हाजी अलताफ शेख, सचिव संजय राऊत, उपाध्यक्ष सावन डोये, कार्यक्रम संयोजक रवि सपाटे, कोषाध्यक्ष हरिश मोटघरे, सहसचिव महेंद्र बिसेन, सदस्य गण महेंद्र माने, नविन अग्रवाल, मोहन पवार, सुरेश येळे, दिलीप पारधी, बाबाभाई शेख, नविन दहिकर, सुनील कावळे, कयूम शेख, साहिल भावडकर, अमित गुप्ता यांनी केले आहे.
गोंदिया जिल्हयातील पत्रकारांनी आपला सहभाग नोंदवावा
श्रमिक पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारा अंतर्गत गोंदिया जिल्हयातील सर्व पत्रकारांनी यात आपला सहभाग नोंदविण्याकरिता आपण आपल्या वर्तमान पत्रात प्रकाशित झालेल्या संपादकिय पुरस्कार, वृत्तवाहिणी पुरस्कार, उत्कृष्ट विकासबार्ता पुरस्कार, शोधवार्ता पुरस्कार तसेच उत्कृष्ट छायाचित्र पुरस्कार करिता आपण ज्या वर्तमान पत्रात लिखाण करित आहा त्यातील उपरोक्त विषयाचे आपले लेख, शोधवार्ता, विकासवार्ता हे मंगळवार १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत, रवि सपाटे मो. नं. ९८२३९५३३९५ यांच्याशी संपर्क साधून भंडारा पत्रिका कार्यालय इंगळे चौक गोंदिया, लोकजन कार्यालय चामट चौक, टी.बी. टोली गोंदिया येथे पाठवावे.