LatestNewsगोंदियाविदर्भ

 14 लाभार्थ्यांना शासकीय पट्टे वाटप

गोंदिया :  उपविभाग गोंदिया अंतर्गत 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताह निमित्त दि.4 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील आबादी भूखंड धारकांना पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमामध्ये मौजा बटाणा व चारगाव येथील 11 लाभार्थ्यांना भूखंड पट्टे वाटप करण्यात आले. तसेच मौजा बनाथर येथील 3 वनपट्टेधारकांना वनपट्टे व 7/12 वाटप करण्याची कार्यवाही उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून परिविक्षाधीन IAS अधिकारी साई किरण नंदाला यांचे उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास तहसिलदार समशेर पठाण तसेच सर्व नायब तहसिलदार गोंदिया व इतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *