LatestNewsPoliticsविदर्भ

त्या १२ सदस्यांवर अपात्रेची टांगती तलवार

सरपंचाने केली जिल्हाधिकार्‍यांना तक्रार
देव्हाडी ग्रा.प.मधील सरपंच -सदस्याचा वाद जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात
६ ऑगस्टला होणार १२ सदस्यांची सुनावणी
तुमसर :
तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत देव्हाडी ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्यांमधील वाद चिघळला असून, १२ ग्रामपंचायत सदस्यांची पदमुक्ती करण्यासाठी सरपंचाने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. यात विहित मुदतीत स्थानिक कर न भरल्याने ही तक्रार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ६ ऑगस्ट रोजी संबंधित सदस्यांची सुनावणी होणार आहे.
ग्रामपंचायतीकडून नागरिकांना विविध कर आकारण्यात येतात. मात्र, येथील १२ सदस्यांनी स्वतःच्या मालमत्तेवरील कराची थकबाकी वेळेवर भरला नाही असा आरोप देव्हाडीचे सरपंच आशिष देवकरण टेंभुरकर यांनी केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४(१)(ह) या कलमाचा आधार घेऊन संबंधित सदस्यांची पदमुक्ती करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
या प्रकरणास पार्श्वभूमी म्हणजे काही दिवसापूर्वी येथील चार सदस्यांनी सरपंचावर टॅक्स वसुली प्रक्रियेत अनियमितता केल्याचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे सध्याचे पदमुक्तीचे प्रकरण म्हणजे ‘आरोप-प्रत्यारोपांमुळे रंगत असलेला वाद’ असल्याचे गावकर्‍यांमध्ये चर्चिले जात आहे.
…………..
सदस्यांची होणार सुनावणी
जिल्हाधिकारी (ग्रामपंचायत) भंडारा कार्यालयातर्पेâ १२ ग्रामपंचायत सदस्यांना सुनावणी करिता नुकतीच नोटीस मिळाली आहे. यात बादल राजकुमार खांडेकर, चंद्रशेखर देवराम दमाहे, शैलेश चंद्रकांत ठाकरे, अजय चंदन बिरणवारे, संजय विजय लिल्हारे, आशा लिखीराम बिरणवारे, संध्या कृष्णा रोडगे, सुनिता रमणलाल बिरणवारे, विणा निकलेस जुनघरे, कीर्ती शैलेश दमाहे, याचिका मुकेश मुटकुरे या सदस्यांच्या समावेश आहे. देव्हाडी ग्रामपंचायतीत एकूण १३ सदस्य असून एका सदस्याचा मृत्यू झाला आहे. सदस्यांकडून या तक्रारीवर काय प्रतिक्रिया येते व जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीदरम्यान काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *