तलावाची पाळ फुटली; पिकांची अतोनात नुकसान
मासोळ्याही गेल्या वाहून; मत्स्य व्यवसायिकांचे नुकसान तोट्यात
साकोली : येथील तलाव वार्डातील गाव तलावाची पाळ दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास मध्यभागातून फुटली. त्यामुळे शेतकर्याचे हजारो हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय तलावातील मासोळ्याही तलाव फुटल्याने वाहत गेल्या. त्यामुळे मत्स्य व्यवसाय सुध्दा तोट्यात आला आहे. त्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न साकोली येथील नागरिकांना पडला आहे. अनेक पक्ष, संघटनांकडून चौकशीची मागणी करण्यात आली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुध्दा आता जोर धरू लागली आहे. शेतकरी विविध संकटांचा सामना करीत असताना १ ऑगस्टला पहाटेच्या सुमारास साकोली येथील १०० वर्षे जुन्या तलावाची पाळ फुटली. अथांग तलावातील पाणी रिकामे झाले. हजारो हेक्टरमधील धानासह पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे साकोली तालुक्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. तलावात मासेमार बांधवांकडून मत्स्यबीज सोडण्यात आले. काही दिवसांनी मासोळ्या पकडण्यासाठी प्रारंभ होणार असताना तलावाची पाळ फुटल्याने तलावातील मासोळ्या वाहून गेल्या. त्यात मासेमार बांधवांचे मोठे नुकसान झाले. तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाला माहिती सुध्दा देण्यात आली होती. तीन वर्षाअगोदर सुध्दा तलावातील पाणी पाळीतून लिकेज होत होता. पाळीवर माती टाकण्याची सूचना सुध्दा देण्यात आली. परंतु याकडे कानाडोळा करण्यात आला. त्यामुळे तलावाच्या पाळीला धोका निर्माण झाला. अन् होत्याचे नव्हते झाले. तलावातील पाणी रिकामे झाल्याने तलाव कोरडा पडत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पाळीव जनावरांना पिण्यासाठी व धुण्यासाठीही तलावात पाणी नसल्याने पशुपालकांनाही अडचणीचा सामना करावा लागणार आहे. पुढे दिवाळी सण झाल्यानंतर रब्बी पिकासाठी पाणी कुठचे मिळणार? असा प्रश्नही शेतकर्यांकडून विचारला जात आहे. तलाव दुरुस्ती करण्याच्या कामात कुचराई करणारे पण लक्ष न देणारे अधिकारी इंजिनियर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन बहुजन आघाडीचे कार्यकर्ते डी.जी. रंगारी, महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे, साकोली तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, साकोली तालुका महिला अध्यक्ष शितल नागदेवे, यादोराव गणवीर, अमित नागदेवे व इतर कार्यकर्त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकात कळविले आहेत.

खा.डॉ. प्रशांत पडोळे यांनी घटनास्थळाची केली पाहणीसाकोली येथील तलाव फुटल्याने हजारो हेक्टरमधील पीके वाहुन गेली. सदर घटनेची माहिती मिळताच पाहणी करण्यासाङ्गी खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रत्यक्ष घटना स्थळाची पाहणी केली व तलावाच्या पाळीचे तात्काळ दुरूस्तीचे काम करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले. तसेच नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पिकांचे पंचनामे करून कारवाई करण्याची आदेश दिले.