LatestNewsगोंदियामहाराष्ट्र

मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून जल सिंचन प्रकल्प राबविण्यात येणार

गोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्यापक प्रभाव असलेला भव्य जल सिंचन प्रकल्प रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक नागरिकांच्या जीवनावर सकारात्मक व्यापक परिणाम होईल, असा भव्य जल सिंचन प्रकल्प गोंदियात राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ॲक्सिस बँक फाउंडेशन, भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशन यांच्यामध्ये परस्पर सहकार्याने झालेल्या सामंजस्य करार झाला असून गोंदिया जिल्ह्यामध्ये जल सिंचन प्रकल्प (हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रोजेक्ट) राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना बळकटीकरण करुन कामांचे नियोजन, संनियंत्रण व अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामपंचायतींना सहयोग करण्यासाठी भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशन द्वारे 10 सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन दोन तालुक्यांमध्ये काम करणार आहे. सदर प्रकल्प पाच वर्षापर्यंत राबविण्यात येईल.
सदर प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता राज्यस्तरावर भारत रुरल लाइव्हलीहूड फाउंडेशनचे एसपीएमयुची स्थापना करण्यात आलेली आहे. 26 तालुक्यांमध्ये एकूण 878 लघु पाणलोट क्षेत्राचे विकास करणे आहे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून 4.39 लक्ष हेक्टर जमिनीचे क्षेत्र सिंचित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आहे. कमीत कमी एक लक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न सिंचित करणे. जवळपास 1.77 लक्ष हेक्टर असिंचित जमीन सिंचित करणे. 800 ग्रामरोजगार सेवक व 6000 आरपीआय व बचतगट सदस्यांना डीपीआर व लाइव्हलीहूड प्लॅनच्या प्रभावी नियोजन व अंमलबजावणीकरीता प्रशिक्षण देणे. मृदा व जलसंधारणाच्या व्यवस्थापनाद्वारे जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे तसेच पावसाच्या पाण्यावर कमी अवलंबून राहणे. बहुपीक प्रणालीला प्रोत्साहन देणे. मनरेगाच्या निधीचा उपयोग करुन टिकाऊ व उत्पादक संरचनांची निर्मिती करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्ट्ये आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *