Bhandara news; ज्वेलर्स दुकान फोडले; २.६८ लाखाची चोरी
(भंडारा) : येथील ज्वेलर्सची दुकान फोडून चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पहेला येथे शिवाजी चौकात डहारेच्या चाळीत आदित्य ज्वेलर्स नावाने सोने चांदीचे दुकान आहे. गुरुवारच्या रात्रीला सात वाजताच्या दरम्यान नंदलाल खरवाळे दुकानाचे मालक यांनी आपली दुकान बंद करून वाकेश्वर या गावी गेले, परंतु रात्रीच्या सुमारास दुचाकी वर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चोरांनी दुकानाचे शटर उचलले व त्यानंतर दुकानात प्रवेश करून साहित्य व ८ हजार रोक, चांदी व सोने असा एकुण २ लाख ६८ हचार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून नागरिकांनी दुकानाजवळ जमाव घातला. या घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस पथकाने धाव घेतली व नंदलाल खरवाडे यांना बोलावून ज्वेलर्सच्या दुकानाच्या समोरच्या दुकानावरून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून घेतल्यानंतर दोन चोर गाडीवरून आल्याचे दिसून आले. ते सर्व फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत करीत आहेत.