LatestNewsगोंदियाविदर्भ

Organ donation”अंगदान जीवन संजीवनी”अभियानाची सिटी पोलिस स्टेशन प्रशासनाने केली जनजागृती

पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या पुढाकाराने अनेक पोलिस अधिकारी व कर्मचारी अंगदानासाठी झाले सजग
गोंदिया (Gondia News) :
महाराष्ट्रातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी दि.३ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवयवदान ही एक चळवळ म्हणून राज्यभरात राबविण्याचा संकल्प सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केला आहे.त्या अनुशंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यात दि.3 ते 15 ऑगस्ट पर्यंत “अंगदान जीवन संजीवनी”अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जाण्याचे मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.
जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभाग गोंदियाच्या वतीने “अंगदान जीवन संजीवनी” अभियानाची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत आहे.शासकीय सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे,जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, यांच्या एकत्रित सहकार्याने जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्था,शासकीय कार्यालये,शाळा, महाविद्यालये व अशासकीय संस्था व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक “अंगदान जीवन संजीवनी”अभियान अंतर्गत अवयवदान शपथ व जनजागृती करित आहे.
मानवी जीवन वाचविणाऱ्या अंगदान विषयक जनजागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत गोंदिया शहरातील सिटी पोलीस स्टेशन येथे दि. 5 ऑगस्ट रोजी विशेष अवयनदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन अवयवदान जिल्हा समुपदेशक भाविका बघेले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे, जिल्हा आयईसी अधिकारी प्रशांत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “अंगदान म्हणजे मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश देण्याची संधी आहे.पोलीस दल समाजात प्रेरणादायी भूमिका बजावत असते, त्यामुळे अंगदानाच्या बाबतीतही आम्ही समाजापुढे आदर्श ठेवू शकतो.”
अवयवदान जिल्हा समुपदेशक भाविका बघेले यांनी अंगदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.त्यांनी प्रत्यारोपणासाठी गरज असलेल्या अवयवांची यादी, अंगदानाची प्रक्रिया, मृत्यू नंतर व मेंदूमृत व्यक्तींचे दान या विषयांवर सोप्या भाषेत माहिती दिली.त्यांनी सांगितले की भारतात दररोज हजारो रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात. पण जागरूकतेअभावी अनेक संधी दवडल्या जातात.या कार्यक्रमप्रसंगी अनेक पोलीस अधिकारी, महिला पोलीस कर्मचारी, व अन्य स्टाफ मेंबर्स यांनी आपल्या संमतीपत्र भरून अंगदानाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी अंगदानाची शपथ घेतलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वी झाले असून, यामुळे गोंदिया जिल्ह्यात अंगदानाबाबत सकारात्मक लाट निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
……………………………..
सामाजिक कार्यात  पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांचा पुढाकार
पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी याआधीही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर भूमिका निभावली आहे. या कार्यक्रमातही त्यांनी स्वतः अंगदानासाठी संमती दिली आणि उपस्थितांना प्रोत्साहित केले.त्यांचे म्हणणे होते की, समाजासाठी काम करताना अशा संवेदनशील विषयांची जाणीव असणे आणि कृतीशील होणे, हे आमचे कर्तव्य आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *