LatestNewsPoliticsगोंदियाविदर्भ

Mla Badole; शासन दरबारी जनतेच्या प्रश्न मांडणार : आ. राजकुमार बडोले

राष्ट्रवादी विचार मंथन सभा व सत्कार समारंभ थाटात
सडक अर्जुनी :
सत्तेचा उपयोग केवळ अधिकारासाठी न होता. तो लोकसेवेच्या कार्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यासाठी व्हावा. संघटना मजबूत झाली तरच विकासाच्या कार्यांची अंमलबजावणी शक्य होते. शासनाच्या माध्यमातून मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे व सुरूच राहील. जनतेच्या समस्यांना अधिक प्रभावीपणे शासनदरबारी मांडून जास्तीत जास्त लाभ मिळवून देणार, असे प्रतिपादन आ.राजकुमार बडोले यांनी केले.
सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी विचार मंथन सभा व सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमात गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव राजेंद्र जैन, संचालकपदी निवड झाल्याबद्दल आ.इंजि.राजकुमार बडोले आणि युवक जिल्हाध्यक्ष केतन तुरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात राजेंद्र जैन यांनी बँक कारभाराबाबत आणि संघटनेच्या समृद्धीचा विचार मांडत कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. जिल्हाध्यक्ष प्रेम रहांगडाले यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना पक्षाची ताकद ही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे ठामपणे सांगितले. कार्यक्रमास महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, युवक जिल्हाध्यक्ष केतन तुरकर, देवेंद्र चौबे, माजी जि.प.सदस्य किशोर तरोणे, डी.यु.रहांगडाले, तालुकाध्यक्ष अविनाश काशीवार, नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्षा वंदना डोंगरवार, जि.प.सदस्या सुधा रहांगडाले, शिवाजी गहाणे, बांधकाम सभापती आनंदकुमार अग्रवाल, शशिकला टेंभुर्णे, नगरसेवक देवचंद तरोणे, शाहिस्ता शेख, दीक्षा भगत, कामिनी कोवे, माजी जि.प. सदस्य रमेश चुर्‍हे, गजानन परशुरामकर, अजय लांजेवार, देवाजीबापू बनकर, सुधाकर पंधरे, मतीन शेख आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अविनाश काशीवार यांनी केले. संचालन महिला तालुकाध्यक्ष रजनी गिर्‍हेपुंजे तर आभार प्रदर्शन युवक तालुकाध्यक्ष दिनेश कोरे यांनी केले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *