LatestNewsगोंदिया

Medical College Gondia: वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळच भगदाड

पालिका व महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्षअनर्थ घडल्यानंतरच जाग येणार का?

गोंदिया : Medical College Gondia शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशव्दाराला लागून असलेल्या नालीवर मोठा भगदाड पडला आहे. मागील काही दिवसांपासून ही समस्या निर्माण झाली असून याकडे पालिका व महाविद्यालय प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालयात येणार्‍या-जाणार्‍या नागरिक व रूग्णांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एखादे अनर्थ घडल्यानंतरच प्रशासनाची झोप उघडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या इमारतीत Medical College Gondiaशासकीय वैद्यकीय महाविद्यालयही कार्यरत आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून रूग्ण उपचारसासाठी दाखल होतात. शिवाय मेडीकलचे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी सतत वर्दळ असते. महाविद्यालय प्रवेशव्दाराला लागून नाल्यांच व्यवस्था आहेत. परंतु, सदर नाल्यांकडे वर्षानुवर्षांपासून दुर्लक्ष करण्यात आल्याने मोडकडीस आल्या आहेत. असे असले तरी लघु व्यापारी त्या ठिकाणी आपली दुकानदारी थाटून उपजिविका भागवित असतात. परंतु, मागील दोन ते दोन दिवसापूर्वी Medical College Gondia महाविद्यालय प्रवेशव्दाराजवळ त्या नालीचा स्लॅब कोसळून भला मोठा खड्डा तयार झाला आहे. यामुळे धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याचे दिवस असून या खड्ड्यामुळे महाविद्यालयाच्या आवारभिंतीला तडे जाण्याची शक्यता आहे. तर महाविद्यालय प्रवेश करताना अप्रिय घटनेची शक्यताही वर्तविली जात आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे असतानाही पालिका व महाविद्यालय प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अपघातानंतरच विभागाला जाग येणार का? असा प्रश्न रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *