Gondia police: जिल्हा पोलीस दलातर्फे १०कि.मी. सायकलिंग स्पर्धेचे आयोजन
फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह विशेष उपक्रम
गोंदिया : जिल्हा पोलीस दलातर्फे फिट इंडिया मोहीम अंतर्गत श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली २३ ऑगस्ट रोजी सकाळी ०६ .०० वा. पोलिस मुख्यालय गोंदिया येथुन १०कि.मी. सायकल्थॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सायकल्थॉन स्पर्धेचे सुरुवात पोलीस मुख्यालय गोंदिया येथुन करून आय टी आय -फुलचूर नाका -जयस्तंभ चौक-आंबेडकर चौक -नेहरू चौक पर्यंत ५ किमी जाणे व परत नेहरू चौक-जयस्तंभ चौक -फुलचूर नाका-पोलीस मुख्यालय गोंदिया येथे समापन करण्यात आले.

सदर सायकल्थॉन स्पर्धेमध्ये श्री गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया , अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया, श्रीमती रोहिणी बानकर , उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया , प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव, साहिल झारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया, गोंदिया , रामदास शेवते, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह, जिल्ह्याचे सर्व पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार व त्यांचे कुटुंबीय,संडे सायकलिंग ग्रुप चे सदस्य व स्थानिक महिला व पुरुषांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

१० किमी सायकल्थॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांपैकी पुरुष गट व महिला गट मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय येणाऱ्या धावकांना पोलीस अधीक्षक श्री गोरख भामरे यांचे हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. पोलीस अधीक्षक गोरख भामरे व अभय डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी यांचे मार्दर्शनाखाली श्रीमती रोहिणी बानकर , उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया , प्रमोद मडामे, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव, साहिल झारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा, पुरुषोत्तम अहेरकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, रामदास शेवते प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह, नागेश भाष्कर पो नी वाहतूक शाखा, राजेश सरोदे रा पो नी, यांनी सदर स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले.

