HealthLatestगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

maharashtra winter session 2025 : पोलीस पाटलांच्या महामोर्चा’ने दणाणले विधीमंडळ

हिवाळी अधिवेशनावर मोर्चा : हजारो गावकामगार एकवटले
गोंदिया :
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या नेतृत्वाखाली, आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी ११ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथील विधान भवनावर (maharashtra winter session 2025) आयोजित केलेल्या ऐतिहासिक महामोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. निवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करणे आणि २५ लाखांच्या विमा संरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील हजारो पोलीस पाटील या मोर्चात सहभागी झाले होते. या राज्यव्यापी मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील पोलीस पाटलांचा सहभाग लक्षणीय होता. गोंदिया जिल्हाध्यक्ष राजेश बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपुरात दाखल झाले होते.

ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावणार्‍या पोलीस पाटलांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली. निवृत्तीचे वय ६० वरून वाढवून ६५ वर्षे करणे, पोलीस पाटील व कुटुंबीयांसाठी मेडिक्लेम आणि पोलीस पाटलांसाठी २५ लाखांचा विमा सुरू करणे, पहिल्या ५ वर्षांनंतर नियुक्ती कायम करणे, कोतवालप्रमाणे अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आणि एसओपी स्थापन करणे, प्रवास व दैनिक भत्त्यात वाढ, निवृत्तीनंतर सन्मान मानधन आणि पोलीस पाटील वेल्फेअर फंडाची स्थापना करणे, गृह व महसूल विभागात ५ टक्के आरक्षण लागू करणे आदि मागण्यांच्या पुर्ततेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. (maharashtra winter session 2025)  या मोर्च्याचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे राज्याध्यक्ष शिवाजीराव कोलते यांनी केले. (maharashtra winter session 2025)  या मोर्च्यात गोंदिया जिल्ह्यातून जिल्हा अध्यक्ष राजेश बन्सोड, यादोराव मदनकर, विलास साखरे, राष्ट्रपाल भोवते, भूपेंद्र बागडे, रतन खोब्रागडे, कपिल टेंभरे, राजेंद्र पटले, प्रेमनाथ देशमुख, साहेबदास बंम्बुले, रवींद्र क्षीरसागर, हेमराज सोनवाने, सोमराज बघेले, नंदा ठाकरे, अनिता लंजे, हेमलता देशमुख, शकुंतला पाथोडे, कीर्ती झोडे, मित्रविंदा रहांगडाले, वैशाली राणे, रविता ऊईके, आशा बोपचे व कुसमन रहांगडाले, या प्रमुख कार्यकर्त्यांसह डी.एम.बन्सोड (देवरी), गजानन जांभुळकर (चिचगड), लालचंद मच्छीये (सालेकसा), प्रेमलाल टेंभरे (आमगाव), सुरेश बोरकर (डुग्गीपार), टीकाभंराम कापगते (नवेगावबांध), रमेश झोडे (अर्जुनी मोरगाव), बनवली मंडल (केशोरी), क्रांतीकुमार बिसेन (रावणवाडी), रतन खोब्रागडे (तिरोडा), सोमराज बघेले (गोरेगाव), विजय कापसे (गोंदिया ग्रामीण) यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *