LatestNewsगोंदियाविदर्भ

मनसेचा रुद्ररूप आंदोलन;‘अर्धनग्न आंदोलन !

भीमघाट पुलाच्या प्रश्नावर शासनविरोधी घोषणाबाजी

गोंदिया : जिल्ह्यातील भीमघाट-पांगोली नदीवरील धोकादायक पुलाच्या नूतनीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रीय भूमिकेवर संताप व्यक्त करत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन, रास्तारोको, तसेच शासनविरोधी घोषणाबाजी करत खळबळ उडवून दिली.या धोकादायक पुलामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक आणि शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला असून, पूल संरचनेतील तांत्रिक दोष, कोसळलेली रेलिंग आणि गाळाने तुंबलेला बंधारा या साऱ्या बाबींचा प्रखर विरोध करत मनसेने प्रशासनाला एक आठवड्याचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने आज हे आंदोलन उभं राहिले.मनसेचे गोंदिया शहराध्यक्ष सुरेश (नानू) चौधरी यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात, “करायचं काय या कार्यकारी अभियंताचं – खालती डोकं वरती पाय” अशा घोषणा देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर संतप्त आंदोलन करण्यात आले.
अधिकारी गायब; खुर्चीला हार अर्पण :  आंदोलनादरम्यान पदाधिकाऱ्यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीला हार व श्रीफळ अर्पण करत तीव्र निषेध नोंदवला. “मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या आगमनाच्या भीतीने अधिकारी खुर्च्या सोडून पळाले,” असा थेट आरोप मनसेने केला.

आमदार विनोद अग्रवाल यांच्यावरही टीका  ठेकेदारांचे आमदार? 
यावेळी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्यावरही टीका करण्यात आली. “हे आमदार केवळ ठेकेदारांचे असून, जनतेच्या समस्या त्यांच्यासाठी गौण आहेत,” अशी टीका करत, मनसेने त्यांच्यावरही आघात केला. “गोंदियात मेडिकल कॉलेज, रुग्णालय, नगर परिषद यांची अवस्था बघा – विकास नाही, केवळ डागडुजीची दिखावा,” असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर २-३ दिवसांत पूल दुरुस्तीसंबंधी तातडीने पावले उचलली नाहीत, तर पुढचे आंदोलन अधिक रुद्ररूप धारण करेल.” भीमघाट-पांगोली नदीवरील जीर्ण पूल तातडीने दुरुस्त करावा. ,नवीन दोन पदरी पुलाच्या बांधकामास तात्काळ मंजुरी द्यावी. ,परिसराचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करावे.”जनतेच्या सुरक्षेसाठी जर शासनाला जाग येत नसेल, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ती जाग आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!” अशा शब्दांत आंदोलनाचा निष्कर्ष देण्यात आला.
याप्रसंगी उपस्थितीमध्ये मनसे शहराध्यक्ष सुरेश(नानू) चौधरी व तसेच समता परिषद जिल्हाध्यक्ष विष्णू नागरिकर, मनसे माजी शहर संघटक क्षितिज वैद्य, शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, डिलेश उके, छोटा गोंदिया शाखा अध्यक्ष कार्तिक राऊत, उपशाखा अध्यक्ष शुभम शहारे, टोनेश बनकर, भूमेश बनकर, विकास बनकर, निलेश बनकर, आयुष फुंडे, नवीन बनकर, आशिष उके, संजू आपतूरकर, राजकुमार नागरिकर, सुरेश बनकर, शंकर बनकर, भरत ठाकरे, पप्पू भगत, देव सोनवाने, शुभम राठोड, प्रवीण बनकर, जॉन बिसेन, अर्जुन सोनुले, गौरी नागरिकर, बादल रहांगडाले तसेच सर्व महाराष्ट्र सैनिक व समता परिषद चे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की येणाऱ्या काळात लवकरात लवकर निर्णय नाही लागला तर मनसे स्टाईल मध्ये काय होणार हे आम्हाला माहीत नाही पण अधिकारी जनप्रतिनिधी जबाबदार राहतील असे सांगितले.
…………………..
समता परिषदेचेही समर्थन
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद या संघटनेनेही मनसेच्या आंदोलनास पाठिंबा देत, “पांगोलीचा पूल प्रशासनाला का दिसत नाही? दररोज जिवितहानीची वाट का बघताय?” असा सवाल उपस्थित केला.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *