LatestNewsगोंदिया

स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” मोहिमेत महिलांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी : जिल्हाधिकारी प्रजित नायर

गोंदिया : महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब,समाज आणि देशाच्या प्रगतीचे प्रमुख केंद्रस्थान आहे.याच उद्देशाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत “स्वस्थ नारी,सशक्त परिवार” हे विशेष राष्ट्रीय अभियान दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर सर्व वयोगटातील महिला, गर्भवती महिला,किशोरवयीन मुली,बालके सुरक्षित राहाव्यात,त्यांचे आरोग्य सुदृढ असावे यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुशंगाने दि.17 पासुन देशात सर्वत्र “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” राबविण्यात येत असुन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी गोंदिया वासियांना सदर मोहिमेत आपल्या आरोग्याची मोफत तपासणी जवळच्या आरोग्य संस्थेत करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना नोकरी व्यवसाय सांभाळणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.”स्पर्धा” हेच त्यामागील मुख्य कारण मानले जात आहे.फास्ट(जंक) फूड खाण्याची क्रेझ,व्यायाम नाही,अवेळी व अपुर्ण जेवण,अपुरी झोप, अतिरिक्त कामाचा ताण यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यायला सुद्धा महिलांना वेळ मिळत नसल्याची वस्तू स्थिती आहे.दुसरीकडे, अजूनही सर्वत्र विशेषतः ग्रामीण भागातील मुली, महिला मासिक पाळी बद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत.समस्या देखील अनेक जण लपवितात.परंतु,तसे करणे भविष्यासाठी धोकादायक असल्याचे भान त्यांना करुन देण्याची गरज आहे.गर्भाची वाढ न होणे, तसेच गर्भवतीचे वजन,उंची कमी असल्याने प्रसुतीवेळी अडचणी निर्माण होतात.सृष्टीची निर्माता समजली जाणारी “ती” सुरक्षित राहावी या उद्देशाने हे अभियान यशस्वीपणे राबवली जाणार आहे.महिलांच्या सुरक्षिततेसाठी राबविल्या जाणाऱ्या या अभियानाचा सर्व वयोगटातील महिला, गर्भवती महिला, किशोरवयीन मुली, बालके यांनी लाभ घ्यावा आणि स्वतःचे आरोग्य सुरक्षित आहे का याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. माता सर्वात जास्त दुःख,वेदना सहन करते. कौटुंबिक व नौकरी,शिक्षणाच्या व्यापातून त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.पण या अभियानातून त्यांना तणावमुक्ती व मन: शांतीसाठी योगा, व्यायाम करा, जंकफुड न खाता घरात बनवलेले पोष्टिक जेवण खा, पुरेशी झोप, आराम करा, फळे खाण्याचा सल्ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी दिला आहे.

“स्वस्थ नारी,सशक्त परिवार ” मोहिमेत विविध आरोग्य सेवा पुरवल्या जातील,ज्यात खालील गोष्टींचा समावेश आहे:

1. महिलांची आरोग्‍य तपासणी:- ● उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्‍या निदानासाठी तपासणी करणे.● तोंडाचा कर्करोग,स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्‍या निदानासाठीची तपासणी करणे.● जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी.● किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया (रक्तक्षय) तपासणी आणि समुपदेशन.● आदिवासी भागातील महिलांसाठी सिकल सेल तपासणी कार्ड वाटप आणि आदिवासी भागात सिकल सेल आजाराबाबत समुपदेशन.2. माता आणि बाल आरोग्‍य सेवा ● गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी व समुपदेशन करणे.● हिमोग्लोबिन तपासणी, तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन.● बालकांचे आवश्‍यकतेनुसार लसीकरण केले जाईल.3. आयुष सेवा● या अंतर्गत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी, सिध्‍द व नॅचरोपॅथी इ. पर्यायी उपचार पध्‍दतींची सेवा गरजू रुग्‍णांना उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहे. 4. जनजागृती आणि वर्तणूक बदल संवाद ● किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्रे आयोजित केली जातील.● महिला बचत गट आणि पंचायत प्रतिनिधींच्या माध्यमातून खाद्यतेल आणि साखरेचा वापर कमी करण्यावर समुपदेशन.● पोषण विषयी समुपदेशन व निरोगी राहण्‍यासाठी मार्गदर्शन 5. रक्तदान शिबीरे.● 1 ऑक्‍टोबर हा राष्‍ट्रीय स्‍वेच्‍छा रक्‍तदान दिन असून त्‍याअनुषंगाने राष्‍ट्रीय महास्‍वेच्‍छा रक्‍तदान या अभियानात राबविण्‍यात येईल.इंडियन रेड क्रॉस सोसायटी,अखिल भारतीय युवक परिषद इ. संस्‍थांच्‍या साहायाने 1 लाख युनिट रक्‍त गोळा करण्‍याचे ध्‍येय असून, रक्‍तदात्‍यांची नोंदणी करण्‍याचेही प्रस्‍तावित आहे. My Gov. Portal द्वारे रक्‍तदान प्रतिज्ञा उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. 6. नोंदणी आणि कार्ड वाटप: ● आयुष्‍यमान भारत डिजीटल मिशन कार्ड,पंतप्रधान जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत नोंदणी व आयुष्‍यमान वय वंदना कार्ड वाटप सर्व गरजू व पात्र लाभार्थ्‍यांना करण्‍यात येईल. 7. क्षयरोग निर्मुलनासाठी निक्षय मित्र स्वयंसेवकांची नोंदणी.● क्षयरुग्‍णांना दत्‍तक घेऊन त्‍यांना पोषक आहार उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी आणि क्षयरोगाविरुध्‍द जन आंदोलनाला पाठींबा देण्‍यासाठी दानशुर व्‍यक्‍ती, संस्‍था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले जाईल. या करिता माय भारत स्‍वयंसेवक अथवा इतर स्‍वयंसेवकाच्‍या मदतीने निक्षय मित्रांची नोंदणी वाढवण्‍यात येईल, जेणेकरुन क्षयरोग मुक्‍त भारताचे ध्‍येय साध्‍य करणे शक्‍य होईल. ● तपासणी शिबीरामध्‍ये मध्‍ये आवश्‍यक असणा-या रुग्‍णांना विशेषज्ञा कडून तपासणी साठी संदर्भित केले जाईल व त्‍यांच्‍या आवश्‍यक त्‍या रक्‍त लघवीच्‍या तपासण्‍या, सोनोग्राफी, क्षकिरण तपासणी व शस्‍त्रक्रिया मोफत व नियोजन करुन करण्‍यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *