वृक्ष लागवड व संगोपन ही काळाची गरज : उप मुकाअ कुतीरकर
दोडके जांभडी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त “एक पेड मॉ के नाम” कार्यक्रमाचे आयोजन
सडक अर्जुनी : आधुनिकीकरणामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावार विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) फरेंद्र कुतीरकर यांनी केले.दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायात दोडके/जा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभळी च्या आवारात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व लोक सहभागातून जागतिक आदिवासी दिनानिमित्त “एक पेड माँ के नाम ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य भूमेश्वर पटले, पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) विजय लोंढे, गटविकास अधिकारी दिलीप खोटेले,पंचायत समिती सदस्य शालिंद्र कापगते, सरपंचा सौ. रंजिताताई कोराम, उपसरपंच विजय सोनवाने, ग्रामपंचायत अधिकारी बी. डी.लांजेवार आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित अतिथींनी जागतिक आदिवासी दिन व वृक्ष संवर्धन या विषयावर आपले विचार व्यक्त केले. आपला जिल्हा हा जरी जंगलाने व्याप्त असला तरी दिवसेंदिवस वृक्ष तोडीमुळे त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्ष लागवड व संगोपन महत्वाचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायतिचे इतर पदाधिकारी व गावातील नागरिक व इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

