भू-प्रमाण केंद्रामार्फत जनतेला सेवा उपलब्ध
नागरीकांनी उपयोग करावा भूमि अभिलेख विभागाचे आवाहन
भंडारा (Bhandara News) : जिल्ह्यात तहसिल कार्यालयामध्ये सुरू असलेल्या सेतु सेवा केंद्राच्या धर्तीवर भूमि अभिलेख विभागातील उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात भू-प्रमाण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. भू-प्रमाण केंद्रामार्फत भूमि अभिलेख विभागाकडून देण्यात येणा-या अभिलेखांच्या नकला तसेच भूमि अभिलेख कार्यालयाकडे करावयाचे ऑनलाईन अर्ज या बाबतच्या सेवा नागरिकांना सहज उपलब्ध करून देण्याकरीता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांचेकडून उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात भू-प्रमाण केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
भंडारा जिल्हयात उप अधीक्षक भूमि अभिलेख भंडारा व उप अधीक्षक भूमि अभिलेख तुमसर कार्यालयात भू प्रमाण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. भू प्रमाण केंद्रामार्फत नागरिकांना संगणकीकृत मिळकत पत्रिका, मिळकत पत्रिकेतील फेरफार पंजी,सर्व प्रकारचे फेरफार अर्ज भरणे, मोजणी अर्ज भरणे, सर्व प्रकारच्या अपील निर्णयाच्या प्रती व इतर संगाकृत अभिलेख आदी अभिलेखांच्या नकाला नागरीकांना एकाच ठिकाणावरून उपलब्ध होणार आहे. त्याकरीता नागरीकांना लागणारी शासकीय शुल्क भरणा करून भूमि अभीलेख विभागाचे अभिलेख उपलब्ध होणार आहे. भू-प्रमाण केंद्राचा जास्तीत जास्त नागरीकांना उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख भंडारा यांनी केले आहे.