सर्प दंशाने अंभोरा गावातील तरुणाचा मृत्यू

देवरी तालुक्यातील घटना
देवरी (३१) : तालुक्यातील पोलीस स्टेशन चिचगड हद्दीतील ग्राम आंभोरा येथील रहिवासी मनोज कुमार कौशिक (वय ३५) या तरुणाचा विषारी सापाने दंश केल्याने त्याचा आज गुरूवार (ता..३१ जुलै) रोजी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास उपचाराकरिता गोंदिया येथे नेत असताना वाटेत निधन झाले.
मृतक मनोज कौशिक सायंकाळी नऊ वाजे दरम्यान जेवण केल्यानंतर झोपण्याकरिता बिछान्यावर गेला. अंथरुणात दडलेला विषारी सापाने अचानक त्याच्या चावा घेतला.त्यांला तातडीने चिचगड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. त्यानंतर त्याला पुढील उपचाराकरिता गोंदिया येथे रेफर करण्यात आले. गोंदियाला नेत असताना वाटेत मनोजने प्राण सोडले. या घटनेची नोंद चिचगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे. गावात निधन झाल्याची वार्ता कळताच गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.