LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

Navegaon bandh : जलाशयातील पाण्याचा अनावश्यक विसर्ग

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय?
अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांचे पीक वाचवण्याचा प्रयत्न.
नवेगावबांध  (Navegaon bandh) :
  भर पावसाच्या काळात नवेगावबांध जलाशयातून सतत पाणी सोडले जात असल्याने स्थानिक नागरिक आणि शेतकरी संतप्त आहेत.जलसंपदा विभागाच्या ताब्यात असलेल्या या जलाशयावर नियंत्रण त्यांचे असले, तरी पाण्याच्या योग्य नियोजनाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जलाशयाच्या क्षेत्रात काही नागरिकांनी शेतजमीन करून बळजबरीने अतिक्रमण केले आहे.आता जलाशय भरल्यामुळे अतिक्रमित जमिनीवरील पिके बुडाली आहेत. ते वाचविण्यासाठी पाण्याचा विसर्ग वारंवार केला जातो.असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून नहराद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर सोडले जात आहे. विशेष म्हणजे, या पाण्याचा नेमका वापर कुठे होत आहे, याची कोणतीही स्पष्टता नाही.मुंगली परिसरात पावसाळ्यातही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने,मोठ्या प्रमाणात नाल्यांना पाणी जात आहे. मग हा पाण्याचा अप्रिय आहे किंवा नाही? असा सवालाही शेतकऱ्यांनी केला आहे.
अडचणीच्या हंगामासाठी साठवणुकीची क्षमता कमी होत आहे.
पावसानंतरही विसर्ग सुरूच
११ ऑगस्ट रोजी सोमवारच्या सायंकाळी नवेगावबांध परिसरात जोरदार पाऊस झाला. तरीही,१२ऑगस्ट रोजी तलावातून पाण्याचा विसर्ग सुरूच होता. नागरिकांचा प्रश्न आहे की,जेव्हा परिसरात नैसर्गिकरित्या भरपूर पाऊस पडत आहे, तेव्हा मौल्यवान जलसाठा वाया का घालवला जात आहे?
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, काही मोजके लोक आणि अतिक्रमणधारकांच्या दबावाखाली पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जातो. अतिक्रमण करून हजारो एकर शेती अवैधरित्या जलाशयाच्या क्षेत्रात काढण्यात आली आहे.याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अशाप्रकारे पाण्याची नासधूस केली जात आहे.पाणी नसलं की विसर्गासाठी घाई केली जाते, मात्र पाणी आल्यानंतर विसर्ग थांबवण्याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. यामुळे खरी गरज भासल्यावरच पाण्याची कमतरता निर्माण होते. जानकारांचे असेम्हणणे आहे की, पाण्याला ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून संबोधणे सोपे असले, तरी त्याची खरी अंमलबजावणी शिस्तबद्ध नियोजनाशिवाय अशक्य आहे पाणी हे फक्त शेतीसाठीच नव्हे, तर पिण्यासाठी, पर्यावरणीय संतुलनासाठीही महत्त्वाचे आहे.अशा परिस्थितीत गरज नसताना पाण्याचा विसर्ग करणे म्हणजे भावी संकटाला आमंत्रण देणे होय. या सर्व प्रकाराकडे जलसंपदा विभाग, पाणी वापर संस्था व स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.काही अतिक्रमणधारकांनी जलाशयाच्या क्षेत्रात अतिक्रमण करून शेतजमिनी काढले आहेत‌.जलाशय भरल्यामुळे त्यांच्या शेत बुडाले आहेत.त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर केला जातो असा आरोप काही स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकारावर तातडीने लक्ष देऊन पाण्याच्या विनियोगाचे नियोजन काटेकोरपणे करणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. पाण्याने जर डोळे वटारले तर रब्बी हंगाम व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीररित्या उपस्थित होऊ शकतो.अशी भीती स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

———————————————————-
सर्वच ठिकाणी पावसाचा जोर नाही. त्यामुळे परिसरातील काही गावातून पाण्याची मागणी होत आहे.त्यामुळे पाणी वाटप संस्थांनी पत्र देऊन मागणी केल्यामुळे,पाण्याचा विसर्ग केला जातो. ९० टक्केच्या वर जलाशय भरले की, पुढील पावसाचा अंदाज पाहून जलाशय रिकामे करावे लागते. ही तांत्रिक बाब आहे.
-समीर बनसोडे, उपविभागी अभियंता,
पाटबंधारे उपविभाग नवेगावबांध.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *