LatestNewsगोंदियाविदर्भ

सालेकसा येथे रानडुकराच्या मांसाची छुप्या मार्गाने विक्री; रतन अंडा सेंटरच्या फ्रीजमध्ये आढळला साठा!

वनविभागाची धडक कारवाई : १० पॉलिथिन पिशव्यांतून मांस जप्त

सालेकसा (गोंदिया) : सालेकसा शहरातील एका नामांकित अंडा सेंटरच्या आड रानडुकराच्या मांसाची अवैध साठवणूक आणि छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार वनविभागाच्या कारवाईमुळे उघडकीस आला आहे. येथील ‘रतन अंडा सेंटर अँड कोल्ड्रिंक्स’ या दुकानातील फ्रीजमधून १० पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरलेले वन्यप्राणी रानडुकराचे कच्चे मांस जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दुकान मालकासह मांस पुरवणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे सालेकसा परिसरातील वन्यजीव तस्करांचे धाबे दणाणले आहेत.सविस्तर वृत्त असे की, सालेकसा येथील रहिवासी पुरुषोत्तम सुरेश भांडारकर यांच्या मालकीच्या रतन अंडा सेंटर अँड कोल्ड्रिंक्स या दुकानात वन्यप्राण्याचे मांस विकले जात असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनरक्षक के. आर. फुंडे व इतर वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने दुकानाची अचानक झडती घेतली. यावेळी दुकानातील फ्रीजची तपासणी केली असता, त्यात एकूण १० पॉलिथिन पिशव्यांमध्ये कच्चे मांस साठवून ठेवल्याचे आढळून आले.जांभळीतील इसमाने पुरवले मांसवनकर्मचाऱ्यांनी दुकानमालक पुरुषोत्तम भांडारकर याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवला असता, सदर मांस हे संरक्षित वन्यप्राणी रानडुकराचे असल्याचे निष्पन्न झाले. हे मांस जांभळी येथील रहिवासी राजेंद्र टेकचंद ढेकवार याने आणून दिल्याची कबुली दुकानदाराने दिली. यानंतर वनविभागाने तात्काळ कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले.वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखलरानडुकराची शिकार करणे, त्याचे मांस बाळगणे, वाहतूक करणे किंवा विक्री करणे हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. या प्रकरणी बिट वनरक्षकांनी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या विविध कलमांन्वये वनगुन्हा क्रमांक ०४५००/११२४९६/०६/२०२६ (दिनांक १२ ऑक्टोबर २०२६) नोंदवला आहे. या गुन्ह्यात आरोपी पुरुषोत्तम सुरेश भांडारकर (रा. सालेकसा) आणि राजेंद्र टेकचंद ढेकवार (रा. जांभळी) या दोघांना रीतसर अटक करण्यात आली आहे.शिकार रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचे आव्हानया भागात रानडुकराची शिकार नेमकी कुठे करण्यात आली? विजेचा प्रवाह लावून की स्फोटकांच्या साहाय्याने ही शिकार झाली? तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा हात आहे आणि मांसाची खरेदी करणारे ग्राहक कोण आहेत, या दिशेने आता वनविभागाने तपास चक्रे फिरवली आहेत.सदर कारवाई उपवनसंरक्षक गोंदिया, सहाय्यक वनसंरक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सालेकसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) ए. बी. वाळके, वनरक्षक के. आर. फुंडे व पथकाने पार पाडली. वनविभागाच्या पुढील तपासामुळे या शिकारीच्या टोळीचे आणखी चेहरे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *