LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

Maharashtra winter Session 2025 :  गोंदिया जिल्ह्यात ८० टक्के गावांमध्ये नळाला पाणी नाही योजना कधी सुरू होणार? राजकुमार बडोले यांचा विधानसभेत प्रश्न

सदन अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव ची स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेलाही मंजुरी देण्याची विनंती
वनहक्क पट्टे वाटप करून घरकुल बांधण्याचा मार्ग मोकळा सरकारने करावा
नागपूर :
 महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra winter Session ) तिसऱ्या दिवशी अर्जुनी मोरगावचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्र पुरस्कृत ‘जल जीवन मिशन’ योजनेच्या अंमलबजावणीवर ताशेरे ओढले. गोंदिया जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि योजनेच्या रखडलेल्या कामांचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की “महाराष्ट्रात ५१,५६० जल जीवन मिशन योजना मंजूर झाल्या होत्या. २०२५ अखेरपर्यंत फक्त २५,५५० योजना पूर्ण झाल्या आहेत. म्हणजे जवळपास २६ हजार योजना आजही रखडलेल्या आहेत. ३१ हजार कोटी रुपये खर्च झाले असले तरी ९० टक्के योजना पूर्ण झाल्या असा दावा फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात गावोगावी लोक विचारतात – नळाला पाणी केव्हा येईल? खोदलेले रस्ते केव्हा होतील? चोरीला गेलेले नळाच्या तोट्या कधी मिळतील?” यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप असल्याचे त्यांनी सांगितले.
………………………………………………
गोंदिया जिल्ह्यातील विदारक चित्र
* जिल्ह्यातील ८६७ गावांपैकी केवळ २५ गावांमध्ये योजना पूर्ण झाल्या.
* उर्वरित ७३८ गावांमध्ये योजना अर्धवट किंवा प्रलंबित.
* १,०४७ पैकी फक्त ४४५ योजना पूर्ण, त्यातल्या त्यात केवळ ९० योजना कार्यान्वित.
* ६०२ योजना अपूर्ण अवस्थेत.
* ८० टक्के गावांना अजूनही नळ जोडणीचे पाणी मिळाले नाही.
…………………………………………………
कंत्राटदारांचा आरोप – “आम्हाला पैसे मिळाले नाहीत”
बडोले यांनी सांगितले की, संपूर्ण जिल्ह्यात फक्त ३-४ एजन्सींना विद्युत कनेक्शनचे काँट्रॅक्ट देण्यात आले असून त्यांनी अवघे १० टक्के काम केले आहे. उर्वरित सर्व योजना प्रलंबित आहेत. “उर्वरित निधी तात्काळ द्या आणि योजना लवकरात लवकर पूर्ण करा,” अशी मागणी त्यांनी केली.
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात फक्त २५ योजना पूर्ण
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात १५० योजना मंजूर असून त्यापैकी फक्त २५ योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित योजना कधी पूर्ण होतील याचे उत्तर प्रशासनाकडेही नाही. “जलस्वराज्य योजनेप्रमाणे जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ होऊ नये,” अशी विनंती बडोले यांनी विधानसभेत (Maharashtra winter Session ) केली.
अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेला त्वरित मंजुरी द्या
गोंदिया जिल्हा हा तलावांचा आणि पाण्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तरीही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते ही शोकांतिका आहे, असे सांगत बडोले यांनी अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सरकारकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. या योजनेला तात्काळ मंजुरी देण्यासाठी बैठक घेण्याची मागणी त्यांनी केली.
……………………………………………….
जल जीवन मिशनची श्वेतपत्रिका काढा
“ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन, लोकप्रतिनिधी व जिल्हा परिषद अध्यक्ष यांना विश्वासात न घेता कंत्राटदारांनी कामे केली आहेत. योजनेची संपूर्ण श्वेतपत्रिका काढावी,” अशी मागणीही बडोले यांनी केली.
…………………………………………………..
वनहक्क पट्टे रखडल्याने घरकुल योजनाही ठप्प
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या वनप्रधान जिल्ह्यांमध्ये नगरपालिका-नगरपंचायतींअंतर्गत हजारो घरकुले मंजूर असूनही वनहक्क पट्टे वाटप न झाल्याने बांधकाम सुरू होऊ शकत नाही. वारंवार प्रस्ताव पाठवूनही कार्यवाही होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *