LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

सौंदडमध्ये २ किलो ६३० ग्रॅम गांजा हस्तगत; एकाला अटक

१ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; डुग्गीपार पोलिसांची मोठी कारवाई!

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत मौजा सौंदड येथील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २ किलो ६३० ग्रॅम ओलसर सुका गांजा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे १ लाख ३१ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदेवाईक व अमली पदार्थ तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.सविस्तर वृत्त असे की, २८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास डुग्गीपार पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली की, मौजा सौंदड येथील शास्त्री वॉर्ड परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणावर गांजा लपवून ठेवण्यात आला असून त्याची चोरटी विक्री केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून संशयित ठिकाणी छापा टाकण्याची योजना आखली.घराच्या झडतीत सापडला अमली पदार्थांचा साठापोलिसांनी शास्त्री वॉर्डातील संशयित विदेश संपत बडोले (वय ३६) याच्या घरावर अचानक छापा टाकला. पंचांच्या उपस्थितीत घराची कसून झडती घेतली असता, घरात लपवून ठेवलेला २ किलो ६३० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी रीतसर पंचनामा करून १ लाख ३१ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला.या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विदेश बडोले याला तात्काळ ताब्यात घेऊन डुग्गीपार पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट) गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कुठून आणला आणि तो कोणाला विकला जाणार होता, या आंतरजिल्हा रॅकेटचा छडा लावण्यासाठी डुग्गीपार पोलीस पुढील सखोल तपास करीत आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *