LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त आमगाव-देवरीत सामाजिक व आरोग्य उपक्रमांची रेलचेल!

बिरसा फाउंडेशन, सविता पुराम व मित्र परिवाराचा पुढाकार; ६ आणि ७ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन
साखरीटोला:
आमगाव-देवरी मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ पुराम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत विविध जनउपयोगी व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बिरसा फाउंडेशन पुराडा’, गोंदिया जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती सौ. सविता संजय पुराम आणि मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने येत्या ६ आणि ७ ऑगस्ट २०२६ रोजी हे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
६ ऑगस्ट: मोफत नेत्र तपासणी व सर्वरोग निदान शिबीर
गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हरिहरभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, चिरचाळबांध (ता. आमगाव) येथे मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद आमदार अविनाश ब्राह्मणकर यांच्या हस्ते होणार आहे.


७ ऑगस्ट: रक्तदान शिबीर, वृक्षारोपण व लोकार्पण सोहळे
शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी दिवसभरात विविध विकासकामांचे लोकार्पण व सामाजिक उपक्रम पार पडणार आहेत:
सकाळी १०:०० वा. (पुराडा): क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन.
सकाळी ११:०० वा. (आमगाव): डी. फार्म फार्मसी कॉलेज, आमगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन गोंदिया जिल्हा भाजप अध्यक्ष सिताताई रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर यांच्या हस्ते होईल.
सकाळी ११:०० वा. (पुराडा): प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व वाचनालयाचा लोकार्पण सोहळा.
दुपारी १२:०० वा. (पदमपूर/आमगाव): वाचनालयाचे लोकार्पण.
दुपारी ३:०० वा. (बोरगाव/बाजार): प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम.
दुपारी ४:३० वा. (देवरी): आमदार संजय पुराम यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजप महिला आघाडी देवरीच्या वतीने वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा.
उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन
आमगाव-देवरी परिसरातील सर्व नागरिक, भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी या सर्व सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सौ. सविता संजय पुराम, बिरसा फाउंडेशन पुराडा आणि मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *