LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

मुरदोली गेट सुरू होताच चार वाघोबांचे दर्शन; नागझिऱ्यात पर्यटकांची चंगळ

गोंदिया | नवचैतन्य वृत्त
गोंदिया :
जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणारे मुरदोली प्रवेशद्वार १ मे पासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून, सुरुवातीच्या काही दिवसांतच या भागात व्याघ्र दर्शनाचा धमाका पाहायला मिळत आहे. रविवारी, ३ मे रोजी सफारीवर गेलेल्या पर्यटकांना एकाच वेळी चार वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यामुळे गोंदिया जिल्ह्यातील व्याघ्र पर्यटनाला मोठी उभारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच मुरदोली जंगल शिवारातील बंड तलाव परिसरात तीन वाघांचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्याच दिवशी चार वाघ एकत्र दिसून आल्याने या परिसरात वाघांचा भक्कम अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी रितेश शहारे हे पर्यटक सफारी करत असताना त्यांना हे चार वाघ एकाच ठिकाणी बसलेले दिसले. त्यांनी तातडीने या दुर्मिळ दृश्याचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले. मुरदोली गेट सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना आता जवळून व्याघ्र सफारीचा आनंद घेता येत आहे. या गेटमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून, त्याचा थेट फायदा स्थानिक रोजगार आणि पर्यटनाला होणार आहे. या व्याघ्र दर्शनामुळे नवेगाव-नागझिरा प्रकल्पाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साहाचे उधाण आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *