LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

वर्षभरात ६६ हजारावर लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोड

नागपूर (Nagpur) : केंद्राच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ निर्देशांकानुसार ग्राहक सेवा प्रदान करताना, महावितरणच्या नागपूर परिमंडलाने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ६६ हजार ४२२ लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोड दिले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनात महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या नेतृत्वात नागपूर परिमंडलात ‘इज ऑफ लिव्हींग’ या संकल्पनेनुसार वीज ग्राहकांना तातडीने सेवा दिल्या जात आहेत.यात मागिल वर्षभरात नागपूर शहर मंडलातील ३८ हजार ७६६, नागपूर ग्रामीण मंडलातील १८ हजार १२६ आणि वर्धा मंडलातील ९ हजार ५३० लघुदाब ग्राहकांना नवीन वीज जोडण्या दिल्या गेल्या आहेत.

यात नागपूर जिल्ह्यात ५६ हजार ८९२ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या, यात सर्वाधिक ११ हजार ८०१ वीज जोडण्या या कॉग्रेसनगर विभागात तर त्याखालोखाल मौदा विभागात ८ हजार ५९७, बुटीबोरी विभागात ७ हजार ४८२, महाल विभागात ७ हजार २६२, सिव्हील लाईन्स विभागात ७ हजार २३, गांधीबाग विभागात ५ हजार १९८, सावनेर विभागात ३ हजर ९४२, उमरेड विभागात ३ हजार ३३९ तर काटोल विभागात २ हजार २४८ वीज जोडण्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यात देण्यात आलेल्या ९ हजार ५३० नवीन वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक ४ हजार ६०५ वीज जोडण्या वर्धा विभागात तर त्याखालोखाल हिंगणघाट विभागात २ हजार ६४१ तर आर्वी विभागात २ हजार २४१ नवीन लघुदाब वीज जोदण्या देण्यात आल्या. या ६६ हजार ४२२ नवीन लघुदाब वीज जोडण्यांमध्ये सर्वाधिक ५३ हजार १३७ या घरगुती वीज जोडण्या असून यात नागपूर शहर मंडलातील ३१ हजार ३४१, नागपूर ग्रामीण मंडलातील १४ हजार ८४० तर वर्धा मंडलातील ६ हजात ९५८ वीज जोडण्यांचा समावेश आहे. याशिवाय परिमंडलात ९ हजार ६३५ वाणिज्यीक, १ हजार २०३ औद्योगिक आणि २ हजार ४४७ इतर वीज जोडण्या देण्यात आल्या.
…………………
तात्काळ वीज जोड
‘महावितरण’कडून ‘इज ऑफ लिव्हिंग’ अंतर्गत नागपूर परिमंडलात नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या भागात मागेल त्यास ताबडतोब नवीन वीजजोड देण्यात येत आहे. ‘महावितरणच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ चा लाभ घेत ग्राहकांनी देखील नवीन वीज जोडणी घेतल्यानंतर त्यांच्या वीज बिलांचा भरणा ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमाने नियमित करुन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *