LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

Deori News : दोन वर्षांपासून सालई पूल ‘जैसे थे’;

‘अच्छे दिना’च्या प्रतीक्षेत जनतेचा जीव टांगणीला!
देवरी :
तालुक्यातील देवरी ते चिचगड या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील सालई पूल गेल्या दोन वर्षांपासून मरणासन्न अवस्थेत आहे. पुलाची दुर्दशा पाहून “साहेब! आमचा विकास दिसला का?” असा संतप्त सवाल आता नागरिक करू लागले आहेत. पावसाळ्यातील पुरामुळे तुटलेल्या या पुलावर प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी केली खरी, पण ही मलमपट्टी आता सामान्य जनतेसाठी ‘मृत्यूचे द्वार’ ठरत आहे. एखादा मोठा बळी गेल्यावरच लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाला जाग येईल का? असा सवाल आता देवरी (Deori News) तालुक्यातील जनतेने विचारला आहे.
आदिवासी बहुल तसेच नक्षलक्षेत्र असलेल्या देवरी तालुक्याची स्थिती अजूनही विकासाच्या बाहेरच आहे. शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी अशा अनेक सोयी सुविधांनी देवरी तालुका ग्रासलेलीच आहे. रस्त्यांची स्थिती तर अतिशय दयनीय आहे. तालुक्यातील सोयीस्कर रहदारी करिता अनेक रस्त्यावर तयार करण्यात आलेले पूल जीर्ण अवस्थेत, असून कठडेविना अखेरची घटका मोजत आहेत. यातच मागील दोन वर्षांपूर्वी देवरी ते चिचगड मार्गावर असलेल्या देवरी शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या सालई परिसरातील छोट्याशा नाल्यावरील रहदारी करिता तयार करण्यात आलेला पावसाळ्यातील पुराच्या पाण्यामुळे तुटून पडले होते. (Deori News) वाहतुकीच्या सोयी करिता त्या ठिकाणी तात्पुरत्या सिमेंट पायल्या टाकून रस्ता सुरळीत करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून “जैसे थे” असलेल्या पुलावरून जड तसेच हलकी वाहतूक सुरू आहे. या मार्गाने अनेक विद्यार्थी, शेतकरी, पोटाची खळगी भरण्याकरिता घरून निघालेले मजूर वर्ग तसेच अनेक सामान्य जनता प्रवास करीत आहेत. रखडलेल्या पुलामुळे जनतेनी मृत्यूला जवळून पाहिले तर, काही प्रवाशांनी मृत्यूला कवटाळले सुध्दा.! (Deori News) दोन वर्षांपूर्वी पुराच्या सालई परिसरातील हा छोटा पूल वाहून गेला होता. तेव्हा तातडीची सोय म्हणून सिमेंटच्या पायल्या टाकून रस्ता सुरू करण्यात आला. मात्र, त्यानंतर या पुलाच्या कायमस्वरूपी बांधकामाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. आज या पुलावरून जड वाहने, एसटी बसेस आणि शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारी वाहने जीव मुठीत घेऊन धावत आहेत. आजघडीला देवरी चिचगड मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या दुप्पट झाली असून,अनेक प्रवाशांचा जीव टांगणीला आला आहे. सामान्य नागरिकांना जीव द्यावे लागणार का? तेव्हाच, नवीन पुलाची निर्मिती होणार का? असा सवाल परिसरातील नागरिकांनी संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधीला केला आहे.
………………………………………….
पुढारी आणि अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून आहेत का?
देवरी ते चिचगड, ककोडी आणि कोरची या मार्गावरून दररोज शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या आणि लोकप्रतिनिधींचे ताफे सुसाट जातात. जनतेचे प्रश्न सोडवण्याचे दावे करणारे हे ‘जनसेवक’ याच तुटलेल्या पुलावरून प्रवास करतात, मग त्यांना या पुलाची दयनीय अवस्था दिसत नाही का? असा खडा सवाल नागरिक विचारत आहेत. या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. तरीही प्रशासनाचे ‘घोडे’ नेमके कुठे अडले आहे, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *