शास्त्री वॉर्ड येथील ज्ञानीराम लटारे यांचे निधन
आज दुपारी होणार अंत्यसंस्कार
गोंदिया: शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरातील प्रतिष्ठित रहिवासी ज्ञानीरामजी लटारे यांचे गुरुवारी, २६ मार्च २०२६ रोजी रात्री ९:०० वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शास्त्री वॉर्डासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून लटारे परिवारावर शोककळा पसरली आहे. एक संयमी आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने नातेवाईक व मित्रपरिवाराकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. दिवंगत ज्ञानीरामजी लटारे यांच्या पार्थिवावर आज, शुक्रवार दिनांक २७ मार्च २०२६ रोजी दुपारी १:०० वाजता पार्वती मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा यांच्या शास्त्री वॉर्डातील सिद्ध हनुमान मंदिर परिसराजवळ असलेल्या निज निवासस्थानावरून निघणार आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि या कठीण प्रसंगी लटारे परिवारास धैर्य मिळो, अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे. दिवंगत ज्ञानीरामजी लटारे यांच्या मागे मुलगा, मुलगी, सुन, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

