अंजोरा येथे तीन दिवसीय भव्य शंकरपटाची सांगता
बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
अंजोरा (आमगाव): येथील श्री कुर्रापाट बाबा शंकरपट समितीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय भव्य शंकरपटाची सांगता दिमाखदार बक्षीस वितरण सोहळ्याने झाली. २३, २४ आणि २५ मार्च २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या शंकरपटात परिसरातून मोठ्या संख्येने बैलजोड्यांनी सहभाग नोंदविला होता. या निमित्ताने आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा आदिवासी काँग्रेस गोंदियाचे अध्यक्ष राजकुमार पुराम हे होते. तर मुख्य बक्षीस वितरक म्हणून आमगाव शिवसेना प्रमुख परमेश कामडे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमगाव काँग्रेस अनुसूचित विभागाचे उपाध्यक्ष पिकेश शेंडे, सेवा सहकारी संस्था अंजोराचे अध्यक्ष संतोष गायधने प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री कुर्रापाट बाबा शंकरपट समितीचे सदस्य बाळकृष्ण पटले, कमलेश बहेकार, सुनील मोटघरे, राजेश मेश्राम, दीपक पटले, मोरेश्वर फुंडे, किरण तरकर, नरेंद्र नेवारे, संजय रहांगडाले, संतोष रहांगडाले, गुड्डू भांडारकर, गोविंद भांडारकर, साहेबलाल कटरे, खुशाल फुंडे, सुनील रहांगडाले, वैंकट वाढई, गिरधारी रहिले, शामराव उईके, मनोहर घरत, दिनेश भजे, राधेश्याम गायधने, हंसराज गायधने, आशिष रहांगडाले, आशिष खरोले व समितीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. बक्षीस वितरण सोहळ्याला अंजोरा व परिसरातील गावांतून प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

