LatestNewsगोंदियामहाराष्ट्रविदर्भ

थकीत वीजबिलापोटी 31 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

‘मार्च एंडिंग’मध्ये महावितरणची धडक कारवाई;

नागपूर, दि. 24 मार्च 2026: ‘आला मार्च एंडिंग, ठेवू नका बिल पेंडिंग’ असे आवाहन करत महावितरणने नागपूर परिमंडलात थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या 31 हजार 295 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 1 ते 22 मार्च या कालावधीत खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक अशा विविध वर्गवारीतील लघुदाब ग्राहकांकडे सुमारे 54 कोटी रुपयांची थकबाकी असून, ही वसुली करण्यासाठी महावितरणने आपली कारवाई अधिक तीव्र केली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचे थेट ‘फील्ड’वर लक्ष महावितरणचा संपूर्ण आर्थिक डोलारा हा दरमहा होणाऱ्या वीजबिल वसुलीवर अवलंबून असतो. वीज खरेदीसह इतर देणी वेळेवर देण्यासाठी ही वसुली अनिवार्य आहे. या मोहिमेचे गांभीर्य ओळखून मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंते अमित परांजपे, संजय वाकडे आणि स्मिता पारखी हे स्वतः परिमंडलातील विविध शाखा कार्यालयांना भेटी देऊन थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत.चोरीची वीज वापरणाऱ्यांवर ‘वॉच’ केवळ वीज कापून महावितरण थांबलेले नाही, तर ज्यांच्या जोडण्या खंडित केल्या आहेत, अशा ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके अचानक भेटी देऊन पडताळणी करत आहेत. जर एखादा थकबाकीदार शेजाऱ्याकडून किंवा अन्य मार्गाने बेकायदेशीरपणे वीज वापरताना आढळल्यास, वीज देणाऱ्या आणि घेणाऱ्या अशा दोघांविरुद्धही कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी या महिन्यात सुटीच्या दिवशीही सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मंडळनिहाय कारवाईचा तपशील:नागपूर शहर मंडळ: 42 कोटी 26 लाखांच्या थकबाकीपोटी 20,558ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित.नागपूर ग्रामीण मंडळ: 8 कोटी 37 लाखांच्या थकबाकीपोटी 6,410 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित.वर्धा मंडळ: 3 कोटी 40 लाखांच्या थकबाकीपोटी 4,357 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित. विशेष म्हणजे, वीजपुरवठा खंडित होताच 19 हजार 725 ग्राहकांनी तात्काळ थकबाकी भरून आपली वीज सेवा पूर्ववत करून घेतली. ही धावपळ आणि नामुष्की टाळण्यासाठी ग्राहकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.धनादेश बाऊन्स झाल्यास बसणार आर्थिक फटका: धनादेशाद्वारे बिल भरणाऱ्या ग्राहकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. चुकीची तारीख, खाडाखोड किंवा खात्यात अपुरी रक्कम असल्यास चेक बाऊन्स झाल्यास 750 रुपये दंड आणि 18 टक्के जीएसटी, असा एकूण सुमारे 885 रुपयांचा भुर्दंड बसू शकतो. तसेच यामुळे ‘सिबिल’ स्कोअरवरही परिणाम होऊन चेकद्वारे बिल भरण्याची सुविधा काही काळासाठी बंद होऊ शकते. हा मनस्ताप टाळण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन बिल भरण्याच्या पर्यायाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महावितरणतफे करण्यात आले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *