शेतकर्यांना हमीभाव मिळावा : आमदार नरेंद्र भौंडेकर
कृषी महोत्सवाचे थाटात उदघाटन
भंडारा (Bhandara) : शासनाचे शेतकरी केंद्री धोरण आहे.मात्र शेतकरी पिकवितो त्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे.निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा हातातोंडाशी असलेला पिकाचा घास हिरावला जातो.अश्यावेळेस हमीभावाने शेतक-यांना उत्पन्नाची काही प्रमाणात शाश्वती मिळेल,त्यामुळे शेतक-यांना हमीभाव मिळावा अशी अपेक्षा आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी आज व्यक्त केली.
कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, भंडारा व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० ते २४ मार्च २०२६ दरम्यान ‘वैनगंगा कृषीधारा महोत्सव २०२६ तथा नव तेजस्विनी जिल्हास्तरीय प्रदर्शनी’ चे आयोजन ‘रेल्वे मैदान, नुतन महाराष्ट्र शाळेजवळ, खात रोड, भंडारा’ येथे करण्यात आले आहे,या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आत्मा संचालक उर्मिला चिखले व उपसंचालक अजय राऊत ,जिल्हा कृषी अधिक्षक संगीता माने, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, माविम व्यवस्थापक संगीता भोंगाडे,उपव्यवस्थापक प्रप्फुल अवघड,उपविभागीय अधिकारी श्री.पाथ्रीकर ,उपविभागीय कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे ,प्रगतीशील शेतकरी तानाजी गायधने,शेषराव निखाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
शेतकर्यांनी नविन योजनांची माहिती घ्यावी,जिल्हयात पोकरा योजना ३५० गावात राबविली जाणार असून या योजनेचा लाभाबाबत जनजागृती करण्यात यावी,असे श्री.भोंडेकर यांनी सांगितले. माविमतर्फे पुरुष सन्मान सोहळयामध्ये पवनी आणि तुमसर तालुक्यातील १२० पुरूषांना सहपत्नीक सन्मानित करण्यात आले . जिजामाता बचतगट हरदोली यांना ११ लक्ष रूपयाचा चेक श्री.भौंडेकर यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी प्रास्ताविकात आत्मा संचालक उर्मिला चिखले यांनी १६० स्टॉल असून या प्रदर्शनामध्ये आधुनिक कृषि यंत्रसामग्री, कृषि निविष्ठा, (बियाणे खते व कीटकनाशके), कृषी क्षेत्रातील Aघ् तंत्रज्ञान व ड्रोनचा वापर तसेच स्वयं सहायता महिला बचत गटांनी उत्पादित विविध उत्पादनांचे स्टॉल असतील. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेंतर्गत उद्योजक लाभार्थ्यां करीता खरीददार विक्रेता संमेलन व शेतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणार्या शेतकर्यांचा सन्मान, माविम मित्र मंडळ यांचे पुरुप सुधार सन्मान सोहळा ही आयोजित करण्यात आला असल्याचे सांगितले. प्रदर्शनात पुढील ४ दिवस परिसंवाद व चर्चासत्र मध्ये नैसर्गीक शेती, सेंद्रिय शेती भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, यशस्वी शेतकर्यांच्या यशोगाथा, प्राथमिक अन्नप्रक्रिया उद्योग, सुक्ष्म सिंचन उद्योग, कृषि पुरक उद्योग (पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय), आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त पर्व महिला सक्षमीकरणाचे, आहार तज्ञांचे मार्गदर्शन व पाक कला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
नैसर्गिक व सेंद्रिय शेती पिक विविधीकरणासाठी पर्यायी पिकांची लागवड तंत्रज्ञान, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन इत्यादी विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन तसेच सर्व शासकीय यंत्रणांकडील योजनांची माहिती येथे एका छताखाली आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात शेतक-यांना यांत्रिकीकरणाचा लाभ देण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन भुमेश नवखरे व राखी कहालकर यांनी केले.

