LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात आमगाव तालुका काँग्रेसचे तर्फे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले; दर कमी करण्याची निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी
आमगाव :-
देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिकच कठीण झाले असून घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे जनतेचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमगाव तालुकाध्यक्ष संजय बहेकार यांच्या नेतृत्वात महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे व महिला तालुकाध्यक्ष छबुताई उके यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटीच्या वतीने गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे गृहिणी, कामगार, शेतकरी तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही वर्षांपूर्वी सुमारे ४०० रुपयांच्या आसपास मिळणारा गॅस सिलेंडर आता ८०० रुपयांपेक्षा अधिक दराने मिळत असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
याशिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल, खानावळ, ढाबे तसेच लहान व्यावसायिकांचे खर्च वाढले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होत आहे. गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींमुळे खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून गॅस सिलेंडरच्या किंमती कमी कराव्यात, तसेच सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
यावेळी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून नरेंद्र मोदी तेरी तानाशाही नही चलेगी नही चलेगी, गॅस का रेट कम करो कम करो, नाम नरेंद्र खाली सिलेंडर अशा प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या.
तसेच महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शहर तालुकाध्यक्ष देवकांत बहेकार, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप टेंभरे, ओबीसी विभागाचे जिल्हा सचिव राधाकिसन चुटे, अनुसूचित जातीचे तालुका उपाध्यक्ष पिंकेस शेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेश उके, पर्यावरण विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अभय ढेंगे, आमगाव देवरी विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल चुटे, भूमेश्वर मेंढे, पंचायत समिती सदस्य रेखा फुंडे धनलाल पारधी, राजेश्वर मच्छीरके, भूमिता मच्छीरके, महेश्वरी लिल्हारे, सुनील मोटघरे, श्याम देशमुख, संतोष सतीशसहारे, प्रमिला राऊत, तेजेश्वरी मेश्राम, लक्ष्मी भुते, किरण बनसोड, शब्बीर शेख, इंदल पाथोडे, प्रल्हाद भांडारकर, उमाकांत उईके, समीर खान, चंद्रभागा पाथोडे, आशा पागोटे, दुर्गा उईके, जानषिकांता उके, राजेंद्र चुटे, अरविंद चुटे, भीमराज हत्तीमारे तसेच तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सदस्य तसेच महिला पुरुष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *