forest fire : वनवणवा रोखण्यासाठी सेवा संस्थेची जनजागृती मोहीम
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
भंडारा : वनवणवा forest fire रोखणे ही केवळ वन विभागाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. जंगल आपल्या पर्यावरणाचा, जैवविविधतेचा आणि स्थानिक जीवनमानाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे जंगल परिसरात कोणत्याही प्रकारची आग लावणे टाळावे तसेच ज्वलनशील वस्तू निष्काळजीपणे फेकू नयेत. मोहाच्या व तेंदूपत्ता संकलनाच्या हंगामात विशेष दक्षता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.
कोठेही forest fire वनवणवा आढळल्यास तात्काळ वन विभाग, ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकार्यांना माहिती देऊन आग नियंत्रणासाठी सहकार्य करावे. प्रत्येक ग्रामस्थाने ग्रामसभांमध्ये सहभागी होऊन वनवणवा प्रतिबंधाबाबत जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. इको डेव्हलपमेंट कमिटी व संयुक्त वन व्यवस्थापन समिती (व्इश्) यांच्या माध्यमातून वनसंरक्षण उपक्रमांना अधिक बळकटी देता येईल. आपल्या छोट्याशा सतर्कतेमुळे मोठे नुकसान टाळता येऊ शकते. म्हणूनच सर्व नागरिकांनी वनवणवा प्रतिबंधासाठी वन विभागाला सक्रिय सहकार्य करावे आणि प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांचे काटेकोर पालन करून जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपली जबाबदारी पार पाडावी.
जंगल जाळल्यामुळे तेंदूपत्त्याचे उत्पादन forest fire लक्षणीयरीत्या घटते, कारण आगीमुळे ताज्या पालवीचे नुकसान होऊन झाडांची वाढ खुंटते. सतत लागणार्या वणव्यामुळे झाडांची पुनरुत्पादन क्षमता कमी होत जाते आणि भविष्यातील उत्पन्नावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. याशिवाय, वनवणव्यामुळे जैवविविधता धोक्यात येऊन अनेक वनस्पती, औषधी प्रजाती, कीटक, पक्षी तसेच लहान वन्यजीवांचे अधिवास नष्ट होतात. forest fire वनवणव्यामुळे परिसंस्थेचा समतोल बिघडतो, मातीची धूप वाढते, जलस्रोतांचे नुकसान होते तसेच पर्यावरण आणि हवामानावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे जंगल जाळणे हा कोणत्याही दृष्टीने फायदेशीर नसून दीर्घकालीन नुकसानकारक आहे. यामुळे सर्वांनी वनसंरक्षणाबाबत जागरूक राहून वनवणवा टाळण्यासाठी सक्रिय सहकार्य करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी केले.
………………………
नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात
वनवणवा प्रतिबंधाबाबत सेवा संस्थेची कार्यशाळा
नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नवेगाव, बोंडे, डोंगरगाव, पिटेझरी, नागझिरा, उमरझरी व कोका या वनपरिक्षेत्रांमध्ये सेवा संस्थेच्या वतीने वनवणवा प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या उपक्रमाला वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यशाळेत वनवणवा ही केवळ आग लागण्याची घटना नसून ती पर्यावरण, जैवविविधता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी गंभीर समस्या असल्याचे सांगून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यशाळेत विशेषतः मोहाच्या हंगामात वनवणवा टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला. मोहाच्या झाडाखाली साचलेला कोरडा पाला-पाचोळा ब्लोअर मशीनच्या सहाय्याने नियमितपणे साफ करून आग पसरण्याचा धोका कमी करता येतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गावनिहाय मोहाच्या झाडांचे अचूक भू-स्थानांकन (उाद-ूaुुग्हु) करून त्यांची डिजिटल नोंद ठेवणे, संवेदनशील क्षेत्रांची ओळख पटविणे आणि आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेवर राबविणे याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
यावेळी गावनिहाय मोहा संकलकांकडून संकलित होणार्या झाडांची तपशीलवार यादी तयार करून त्यामध्ये झाडांची संख्या, स्थान, संकलकाचे नाव व संपर्क माहिती नोंदविण्याची आवश्यकता सांगण्यात आली. तसेच इको डेव्हलपमेंट कमिटी (EDण्), संयुक्त वन व्यवस्थापन समिती (व्इश्) व सामूहिक वनहक्क समित्यांचा वनसंरक्षणात सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. गौण वनउपज संकलनाचे अधिकार मिळालेल्या समित्यांनी वनसंपत्तीचा शाश्वत वापर, जैवविविधतेचे संवर्धन आणि वनवणवा प्रतिबंध याबाबत जबाबदारीने काम करणे गरजेचे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
कार्यशाळेत तेंदूपत्ता कंत्राटदार किंवा कंपनीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या फायर वॉचर, फडी मुंशी व चपराशी यांच्यासाठी स्वतंत्र यादी तयार करून त्यांना जनजागृती व प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. वनवणवा नियंत्रण करताना फायर वॉचर हे प्रत्यक्ष आगीच्या संपर्कात काम करत असल्याने त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. योग्य प्रशिक्षण, समन्वय आणि सुरक्षात्मक साधनांचा वापर करूनच वनवणवा नियंत्रण मोहिमा राबविणे गरजेचे असून वन विभाग, ग्रामसभा व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून वनवणवा प्रभावीपणे रोखता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी व यशस्वी अंमलबजावणीसाठी पियुषा जगताप , क्षेत्र संचालक, नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प, श्री. प्रीतमसिंग कोडापे , उपसंचालक, नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री. व्ही. एन. लांडगे, सहाय्यक वनसंरक्षक , नागझिरा वन्यजीव अभयारण्य, कु. एम. एस. चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक, न्यू नाग्ाझिरा वन्यजीव अभयारण्य, एस.आर.कांबळे, सहाय्यक वनसंरक्षक, कोका वन्यजीव अभयारण्य, एस.ए.रिजवी, सहाय्यक वनसंरक्षक, नवेगाव वन्यजीव अभयारण्य तसेच डी.बी.वाघ यांचे सहकार्य लाभले. एस. यू. मडावी, वनपरिक्षेत्र अधिकारी , बोंडे, कु. सी. बी. भडांगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, डोंगरगाव, कु. पी. ए. रामटेके, वनपरिक्षेत्र अधिकारी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, कु. एस. पी. टेंभरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, उमरझरी, श्री. एस. पी. गोखले, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोका, कु. ए. वी. लांबट, वनपरिक्षेत्र अधिकारी, नागझिरा तसेच श्री. एस. पी. बरसागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पिटेझरी यांनी कार्यशाळेच्या आयोजनासाठी आवश्यक ते सहकार्य व समन्वय साधून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास मोलाची मदत केली.
सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांच्या समन्वय, प्रभावी नियोजन आणि मार्गदर्शनामुळे ही कार्यशाळा सुयशस्वी व प्रभावीपणे पार पडली. सदर कार्यशाळेच्या आयोजन व यशस्वी अंमलबजावणीमध्ये कन्हैया उदापुरे, शशांक लाडेकर, डीलेश कूसराम आणि भास्कर कापसे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
००००००००

