LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

gas cylinder crisis  : व्यावसायिक प्रतिष्ठानांवर प्रशासनाचे धाडसत्र

१५ घरगुती गॅस जप्त, तिरोड्यात एकावर गुन्हा दाखल
गोंदिया :
सद्यस्थितीत निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता, घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कारणांसाठी गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून, संपूर्ण जिल्ह्यात विशेष दक्षता व फिरते पथक स्थापन केले आहे. या पथकाने जिल्ह्यातील आठही तालुक्यांत हॉटेल, कॅटरिंग, मंगल कार्यालय, बेकरी आणि दवाखाने अशा व्यावसायिक ठिकाणांवर धाडसत्र सुरू केले असून, gas cylinder crisis  ताज्या कारवाईत १५ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एकूण २१ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या फिरत्या पथकाने गोंदिया तालुक्यातील १ आणि तिरोडा तालुक्यातील ५ अशा एकूण ६ व्यावसायिक ठिकाणांची कसून तपासणी केली. या कारवाई दरम्यान गोंदिया तालुक्यात ७ आणि तिरोडा तालुक्यात ८ असे एकूण १५ घरगुती गॅस सिलिंडर अवैधपणे वापरले जात असल्याचे आढळून आले. प्रशासनाने हे सर्व सिलिंडर जप्त केले असून, तिरोडा तालुक्यात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. 
घरगुती वापरासाठी असलेल्या सवलतीच्या गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. gas cylinder crisis जागतिक स्तरावरील इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना गॅसचा तुटवडा भासू नये, यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. आगामी काळातही जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत अशा प्रकारे अचानक धाडी टाकल्या जातील आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
…………………
तिरोड्यात दहा सिलिंडर जप्त
जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या टंचाईला gas cylinder crisis  घेवून वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभुमीवर काळाबाजार व अवैध वापर थांबविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार तिरोडा तालुका प्रशासनाने कंबर कसली असून धाडसत्र सुरू केले आहे. यादरम्यान १२ मार्च रोजी सहा ठिकाणी छापा टाकून १० सिलिंडर जप्त केले. यामध्ये करीष्मा बार अ‍ॅड रेस्टारेंट येथून एक सिलिंडर, न्यु ताज बिर्याणी फॅमिली रेस्टारेट येथून दोन सिलिंडर, कटनकर स्वीट्स अ‍ॅड नमकीन येथून एक सिलिंडर, टंग ट्वीस्टर सेंटर येथून दोन सिलिंडर, बाबा भोजनालय व बिर्याणी सेंटर येथून दोन सिलिंडर, जॉनी डेली निड्स येथून दोन सिलिंडर अशा एकूण १० सिलिंडरचा समावेश आहे. सदर प्रतिष्ठानचे संचालक घरगुती सिलिंडरचा वापर करीत असल्याची माहिती तालुका प्रशासनाला मिळाली. यावरून प्रशासनाने कारवाई करीत सिलिंडर जप्त केले. ही कारवाई तहसीलदार एन.एम.ठाकरे यांच्या नेतृत्वात निरिक्षण अधिकारी एम.एस.राऊत, नायब तहसीलदार ए.पी.मोहनकर, पुरवठा निरीक्षक दिगंबर गव्हाणे, पंकज जनबंधू, अश्विन वासनिक यांनी केली.
…………
घरगुती गॅसचे गैरवापर आढळल्यास कारवाई : जिल्हाधिकारी
युध्द परिस्थिती लक्षात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची तसेच गॅस इंधनाचे दरवाढीची, घरगुती गॅसचा गैरवापर वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने घरगुती गॅसचे गैरवापर होत असल्याचे आढळल्यास कार्यवाहीस तयार रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. पेट्रोलियम पदार्थांशी निगडीत अनियमिततांना पायबंद घालण्याच्या दृष्टीने तसेच घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी उपाययोजना करावी, अशा सुचनाही जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *