HealthLatestगोंदिया- भंडारामहाराष्ट्रविदर्भ

hpv vaccine: एचपीव्ही’ लसीकरणाची मुलींना शासनाकडून भेट

गोंदिया : बदलती जीवनशैली, असंतुलित आहार व तणाव यामुळे महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महिलांमध्ये आढळणार्‍या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र सरकारने गंभीर दखल घेऊन देशातील १४ वर्ष वयोगटातील मुलींसाठी hpv vaccine ‘एचपीव्ही’ (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहीम सुरु केली आहे.
महाराष्ट्र राज्यात दि.८ मार्च या ‘जागतिक महिला दिनी’ १४ वर्ष वयोगटातील मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात सुध्दा या लसीकरणाचा ८ मार्च ‘जागतिक महिला दिनी’ शुभारंभ करण्यात आला. आरोग्य विभागाकडून १४ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना hpv vaccine ‘एचपीव्ही’ लस मोफत देण्यात येणार आहे. या लसीकरणामुळे भविष्यात सर्व्हायकल कॅन्सरच्या रुग्णसंख्येत मोठी घट होण्याची शक्यता आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो. मात्र, वेळेवर निदान आणि लसीकरण हा या आजारावर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय मानला जातो. ‘एचपीव्ही’ लसीकरण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधात्मक उपाय असल्यामुळे पालकांनी आपल्या मुलींचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी याकरिता पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. hpv vaccine लसीकरण केल्यास शरीरात या विषाणूविरुध्द प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी ‘एचपीव्ही’ ही प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर मात करण्यासाठी १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे पूर्ण होण्याच्या आधी मुलींना ही लस मोफत दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, आयुष्मान रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ही लस मोफत मिळेल. ‘गार्डासिल’ लसीची बाजारातील किंमत ३ हजार ९२७ रुपये आहे. सरकार ही लस मोफत देत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
…………………………..
काय आहे एचपीव्ही
‘एचपीव्ही’ लसीकरण घेतल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाला नियंत्रणात आणु शकतो. लस योग्य वयोगटात घेणे आवश्यक आहे. लाखो महिलांचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होतो.‘एचपीव्ही’ लसीकरण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासह (ण्ीन्ग्म्aत् ण्aहम्ी) अनेक प्रकारच्या कर्करोगांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. हे लसीकरण मुख्यत्वे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा प्रसार रोखते.
………………
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाकडे दुर्लक्ष नको
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे लाखो महिलांचा मृत्यू झाला आहे. शासनाने ही समस्या कायमची दूर करण्यासाठी गंभीर दखल घेतली असून, हा आजार होऊ नये यासाठी एचपीव्ही लसीकरणाचा प्रतिबंधात्मक उपाय अवलंबिला आहे.
……………………….
एचपीव्ही लसीकरणाचे महत्व
गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंध :-
भारतात महिलांमध्ये आढळणारा हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे, ज्यामुळे दरवर्षी हजारो महिलांचा मृत्यू होतो. एचपीव्ही लस या कर्करोगाचा धोका कमी करू शकते.
लसीकरणाची सर्वोत्तम वेळ :- वयाच्या ९ ते १४ वर्षांच्या दरम्यान ही लस घेणे सर्वाधिक प्रभावी मानले जाते, कारण लैंगिकदृष्ट्या सक्रिय होण्यापूर्वी शरीरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.
केंद्र शासनामार्फत मुलींसाठी मोफत मोहीम :- भारत सरकारद्वारे १४ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी विशेष मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे, जी एकाच डोसद्वारे दीर्घकाळ संरक्षण देते.
लैंगिक संसर्गापासून बचाव :- एचपीव्ही हा लैंगिक संबंधातून किंवा त्वचेच्या स्पर्शातून सहज पसरतो. लसीकरण या संसर्गाची साखळी तोडण्यास मदत करते.

-कैलाश गजभिये
‘उपसंपादक’ जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *