Forest fire : बोरगांवच्या जंगलात वणव्याचा तांडव; वनसंपदा खाक !
आगीच्या धुरामुळे वन्यप्राण्यांचा श्वास गुदमरला
वनविभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह!
देवरी (गोंदिया) : विदर्भातील कडक उन्हाळ्याची चाहूल लागताच निसर्गाच्या कुशीत वसलेली जंगले आता आगीच्या विळख्यात (Forest fire) सापडू लागली आहेत. गोंदिया जिल्ह्यातील देवरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्या बोरगांवच्या जंगलात सध्या वणव्याने रौद्ररूप धारण केले असून, यामुळे मौल्यवान वनसंपदा आणि जैवविविधतेचे अतोनात नुकसान होत आहे. वाढते तापमान आणि मानवी हस्तक्षेप यांमुळे लागलेल्या या आगीने वनविभागाच्या सज्जतेचे धिंडवडे काढले असून, वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्याचा पारा चाळीशी पार करू लागला आहे. उन्हाच्या या तीव्रतेमुळे जंगलातील पालापाचोळा पूर्णपणे वाळून गेला असून, तो एखाद्या स्फोटक पदार्थासारखा काम करत आहे. अशातच, स्थानिक पातळीवर ‘मोहफूल’ वेचणीचा हंगाम जोमाने सुरू झाला आहे. अनेकदा मोहफुले वेचण्यासाठी झाडाखालचा पालापाचोळा साफ करण्यासाठी लावली जाणारी आग वार्यामुळे नियंत्रणाबाहेर जाते आणि संपूर्ण जंगल आपल्या कवेत घेते. बोरगांवच्या जंगलात लागलेल्या या भीषण आगीमागे देखील हेच प्राथमिक कारण असल्याचे बोलले जात आहे.
बोरगांवचे जंगल हे केवळ झाडांचे संकुल नसून ते अनेक वन्यप्राण्यांचे हक्काचे घर आहे. या (Forest fire) आगीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड धुरामुळे आणि उष्णतेमुळे या प्राण्यांचा श्वास गुदमरला आहे. आगीच्या दहशतीमुळे भीतीपोटी वन्यप्राणी आता सुरक्षित ठिकाणांच्या शोधात मानवी वस्त्यांकडे किंवा शेतांकडे धाव घेत आहेत. वाघ, बिबट्या, अस्वल आणि विविध प्रकारचे हरीण यांसारखे प्राणी जर गावांकडे वळले, तर ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या स्थलांतरामुळे केवळ प्राण्यांचा जीव धोक्यात नसून, परिसरातील ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
वनविभागाकडून दरवर्षी वणवा रोखण्यासाठी (Forest fire) ‘अंगारी योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत जंगलात ‘जाळरेषा’ (इग्rा थ्ग्हो) आखल्या जातात, जेणेकरून एका भागातील आग दुसर्या भागात पसरू नये. तसेच, वणवा शोधण्यासाठी आणि विझवण्यासाठी विशेष गस्त पथके तैनात केली जातात. या कामांसाठी शासनाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र, बोरगांवच्या जंगलात ज्या पद्धतीने आग पसरली आहे, ते पाहता या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. निधीचा विनियोग योग्य ठिकाणी झाला असता, तर आज वणव्याने इतके भीषण रूप धारण केले नसते, असा सूर पर्यावरणप्रेमींमधून उमटत आहे.
………………………..
जैवविविधतेचा र्हास आणि पर्यावरणाचे नुकसान
या भीषण आगीत केवळ मोठी झाडेच नाही, तर जमिनीलगत असलेली छोटी झुडपे, दुर्मिळ औषधी वनस्पती आणि अनेक सरपटणारे प्राणी, पक्ष्यांची घरटी भस्मसात झाली आहेत. (Forest fire) एकदा जंगल जळाले की, तिथली परिसंस्था पूर्ववत होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. बोरगांवच्या या नैसर्गिक संपत्तीची झालेली हानी कधीही भरून न निघणारी आहे. आगीच्या धुरामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जित होत असून, यामुळे स्थानिक तापमानात अधिकच वाढ होत आहे.
……………
प्रशासकीय उदासीनता आणि स्थानिकांचा संताप
स्थानिक नागरिकांच्या मते, आग लागल्यानंतर वनविभागाकडून अपेक्षित वेगाने हालचाली झाल्या नाहीत. ‘जंगल जळत असताना अधिकारी कुठे होते?’ असा सवाल गावकरी विचारत आहेत. वनपरिक्षेत्र देवरी आणि वन्यजीव विभागाच्या समन्वयाअभावी ही आग (Forest fire) अधिक पसरल्याचा आरोप होत आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपये वृक्षारोपणावर खर्च केले जातात, पण आहे ते जंगल वाचवण्यात प्रशासन अपयशी ठरत असेल, तर या खर्चाचा उपयोग काय? अशी विचारणा आता सर्वच स्तरांतून होत आहे.

