LatestNewsगोंदिया- भंडारामहाराष्ट्र

“आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन”स्पर्धेत .. अंशुल लांजेवार प्रथम

देवरी – येथील मनोहरभाई पटेल कला, वाणिज्य, व विज्ञान महाविदयालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयाच्या मराठी विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ” मराठी भाषा गौरवदिन व कुसुमाग्रज” या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण झिंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात तीन महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, लोहारा, वी. कौसल्यायन कॉलेज, देवरी व मनोहरभाई पटेल महाविद्यालय, देवरी या तिन्ही महाविदयालयातील एकूण 15 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. डॉ. सुनीता रंगारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात कवीवर्य कुसुमाग्रज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आपल्या अध्यक्षिय भाषणातून प्राचार्य डॉ.अरुण झिंगरे यांनी कवी कुसुमाग्रजांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्वातून मराठी भाषा, मराठी संस्कृती, आणि मराठी साहित्य यांच्या संवर्धनासाठी कुसुमाग्रजांनी केलेल्या कार्याचे, त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारांचे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचे यथोचित चित्रण केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. हरीणखेडे, व प्रा. नंदेश्वर उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणातून डॉ. सुनीता रंगारी यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज व्यक्त केली. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण डॉ. जयपाल चव्हाण,व प्रा. राकेश राऊत यांनी केले. या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, लोहारा चा विद्यार्थी अंशुल संदेश लांजेवार याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला, वी. कोसल्यायन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.गुणेश्वरी वाघाडे हिला द्वितीय तर लोहारा कॉलेज च्या पायल विजय लटये हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुधीर भांडारकर यांनी केले, तर प्रा. हितेंद्र जांभुळकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कु. सलोनी वाटगुरे, कु. कृती गौपाले या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमित टेम्भूर्णे, परिचर दत्तू कागदे, माजी विद्यार्थी कमलेश वाघमारे, तसेच विशाल लाडे,इत्यादी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने करण्यात आली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *