LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

Pratapgad Yatra : एकतेचे प्रतीक; हिंदू – मुस्लिम प्रतापगड यात्रा रविवारपासून

प्रतापगडावर होणार हर हर महादेवाचा गजर
अर्जुनी मोरगाव (प्रतिनिधी) :
सुमारे ४०४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेली हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानली जाणारी प्रतापगडाची ऐतिहासिक यात्रा Pratapgad Yatra यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या या यात्रेसाठी परिसरात जय्यत तयारी करण्यात आली असून “हर हर महादेव” च्या घोषणांनी प्रतापगड परिसर दुमदुमणार आहे. निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या यात्रेला महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार राज्यांतून हजारो भाविक दरवर्षी उपस्थित राहतात. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेदरम्यान भाविक नवस फेडण्यासाठी भगवान शंकराच्या दर्शनासाठी मोठ्या श्रद्धेने येथे येतात. डोंगराच्या पायथ्यापासून सुमारे ७ किलोमीटर उंचावर असलेल्या प्रतापगडावर Pratapgad Yatra प्राचीन शिवमंदिर असून येथे श्रावण, महाशिवरात्री व यात्राकाळात विशेष गर्दी असते. इतिहासानुसार गोंड राजांच्या काळात या किल्ल्याचे महत्त्व वाढले असून स्थानिक परंपरा आणि धार्मिक श्रद्धेचे हे प्रमुख केंद्र मानले जाते. याठिकाणी मुस्लिम समाजाचाही ऐतिहासिक संबंध असल्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे उदाहरण येथे पाहायला मिळते. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देणारी ही यात्रा म्हणून ओळखली जाते.
किल्ल्याची ऐतिहासिक साक्ष : प्रतापगड किल्ल्यावर प्राचीन बांधकामाचे अवशेष, दरवाजे, तटबंदी आणि ऐतिहासिक वास्तू आजही इतिहासाची साक्ष देताना दिसतात. अनेक शतकांचा वारसा जपणारा हा किल्ला परिसरातील सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे.
पर्यटनदृष्ट्या आकर्षण : शिवमंदिर, दर्गा, नैसर्गिक दृश्ये व डोंगररांगांमुळे प्रतापगड परिसर पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. यात्राकाळात धार्मिक वातावरणासोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते.
प्रशासन सज्ज : यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य व वन विभागाच्या समन्वयाने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी पाणी, वैद्यकीय सेवा व वाहतूक नियंत्रणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ही यात्रा सामाजिक ऐक्य, धार्मिक सहिष्णुता आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक ठरत असून मोठ्या भक्तिभावात आठवडाभर चालणार आहे.
………………………………………………….
Pratapgad Yatra प्रतापगडतील महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारुनी ऊर्ससाठी प्रशासन सज्ज
गोंदिया प्रतापगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री निमित्ताने दि. १५ ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत Pratapgad Yatra महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारुनी ऊर्स मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार असून या यात्रेसाठी सुमारे तीन ते चार लाख भाविक व यात्रेकरू उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी सुरू केली आहे. यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांची सुरक्षितता, सुविधा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नियोजन करण्यात आले आहे. यात्रा सुरळीत, सुरक्षित व शिस्तबद्ध पार पडावी यासाठी पोलीस विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामपंचायत, वीज वितरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन तसेच जनसंपर्क विभाग आदींच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता व्यवस्था, वाहतूक नियंत्रण, पार्किंग, सुरक्षा बंदोबस्त तसेच आपत्कालीन मदत केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच गर्दी नियोजन व नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रतापगड येथील महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारुनी ऊर्स हा धार्मिक सलोखा व सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेला उत्सव असून अधिकाधिक भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेले आहे. काही अडचण उद्भवल्यास महत्त्वाचे मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
………………………………………………………..
प्रतापगड यात्रेसाठी बसेसचे वेळापत्रक जाहीर
गोंदिया : जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील Pratapgad Yatra ‘प्रतापगड’ येथे महाशिवरात्री निमित्त विविध भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक यात्रेत सहभागी होत असतात. प्रतापगड यात्रेचे आयोजन दि.15 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान करण्यात आलेले आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी साकोली आगाराकडून पुरेशा बसेसची सोय करण्यात आली आहे. तर पवनी व गोंदिया आगाराकडूनही बसचे नियोजन करण्यात आले आहे. या बसेसद्वारे भाविकांना प्रतापगड येथे घेऊन जाणे व परत आणण्याची सोय केली जाणार आहे, असे साकोली आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांनी कळविले आहे.
असे आहे बसचे वेळापत्रक : साकोलीवरुन प्रतापगडसाठी (मार्गे अर्जुनी/मोगाव) : सकाळी 6.00 वाजता, सकाळी 7.00 वाजता, सकाळी 8.00 वाजता, सकाळी 9.00 वाजता, सकाळी 10.00 वाजता, सकाळी 11.00 वाजता, दुपारी 12.00 वाजता, दुपारी 1.00 वाजता, दुपारी 2.00 वाजता, दुपारी 3.00 वाजता, दुपारी 4.00 वाजता, सायंकाळी 5.00 वाजता. पवनी येथून प्रतापगडसाठी (मार्गे अड्याळ, लाखांदूर, अर्जुनी/मोरगाव) : सकाळी 8.00 वाजता, सकाळी 9.00 वाजता, सकाळी 10.00 वाजता. पवनीवरुन प्रतापगडसाठी (मार्गे आसगाव, विरली, लाखांदूर) : सकाळी 9.00 वाजता, सकाळी 10.00 वाजता. गोंदिया येथून प्रतापगडसाठी (मार्गे कोहमारा, अर्जुनी/मोरगाव) : सकाळी 9.45 वाजता, सकाळी 10.45 वाजता जाणार आहे, असे आगार व्यवस्थापकाकडून कळविण्यात आलेले आहे.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *