LatestNewsगुन्हेवार्तागोंदिया

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा दणका! गोंदियातील चार सराईत गुन्हेगार ३ महिन्यांसाठी तडीपार

गोंदिया शहर पोलिसांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई; गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक
गोंदिया:
आगामी c गोंदिया शहर व परिसरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना भयमुक्त वातावरणात सण साजरे करता यावेत, यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीसाठी गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार:
१) अमर ऊर्फ बंडू मनोहर लाचरवार (वय ४५ वर्षे, रा. गौतमनगर, गोंदिया)
२) वैभव ऊर्फ बिंदू सुशील लदरे (वय ३० वर्षे, रा. सावराटोली, गोंदिया)
३) शुभम पुरुषोत्तम हरदीये (वय २८ वर्षे, रा. बाजपेयी वॉर्ड, गोंदिया)
४) अभिषेक ऊर्फ अंडा मनोज पांडे (वय २६ वर्षे, रा. मालवीय वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया)

गंभीर गुन्ह्यांची मोठी पार्श्वभूमी
तडीपार करण्यात आलेल्या चारही आरोपींविरुद्ध गोंदिया शहर व रामनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, प्राणघातक शस्त्राने दुखापत करणे, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे, जुगार कायदा आणि अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS) यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. त्यांच्या उपद्रवामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सक्षम प्राधिकाऱ्यांकडून आदेश पारित
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी गोंदिया शहर पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५६ अन्वये तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. चौकशी व कायदेशीर पडताळणीनंतर सक्षम प्राधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी आदेश जारी करून चौघांनाही ३ महिन्यांसाठी गोंदिया जिल्ह्याच्या सीमांमधून तडीपार केले.
कारवाई करणारे पोलीस पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील दरेकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे, एलसीबीचे पोहवा प्रकाश गायधने, पोलीस अंमलदार छगन विठ्ठले, एसडीपीओ कार्यालयाचे पोहवा रऊफ पठाण, गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे पोहवा निशिकांत लोंदासे, पोलीस अंमलदार दिनेश बिसेन व गुन्हे प्रकटीकरण पथकाने (DB Squad) यशस्वीरीत्या पार पाडली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *