LatestNewsगोंदिया- भंडाराविदर्भ

चेक पोस्टवरील वसुलीला घेवून खा. पडोळे यांचे संसद परिसरात आंदोलन; ट्रक चालकांवरील अन्यायाविरोधात आवाज बुलंद

गोंदिया : जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर येथील चेक पोस्टवर सुरू असलेल्या कथित अवैध वसुली प्रकरणाला घेवून खा. प्रशांत पडोळे यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. तपासणी नाक्यावर धडक देवून अधिकाऱ्यांचे कान टोचल्यानंतर थेट संसद परिसरात या मुद्याला घेवून आंदोलन केले. आरटीओच्या नावाखाली होणारी मनमानी, बेकायदेशीर वसुली आणि अनावश्यक दबाव याविरोधात जनप्रतिनिधींनी तीव्र निषेध व्यक्त करत गुंडागर्दी चालणार नाही, अन्याय स्वीकारला जाणार नाही आणि कायद्याचाच राज प्रस्थापित होईल’ असा स्पष्ट संदेश दिला. सरकारने याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली.गोंदिया जिल्हा राज्याच्या शेवटचा टोकावर आहे. शिवाय मध्यप्रदेश व छत्तीसगढ या दोन राज्याच्या सिमा जिल्ह्याला लागून आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वर छत्तीसगढ राज्याच्या सिमेवर देवरी तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे शिरपूर तपासणी नाका आहे. या नाक्यावरून ये-जा करणाऱ्या वाहन, ट्रक चालकांकडून कार्यरत अधिकारी कर्मचारी विनाकारण वसुली करीत असल्याची बाब समोर आली आहे. या संदर्भात खा. प्रशांत पडोळे यांनी थेट तपासणी नाका गाठून हा प्रकार उजागर केला. दरम्यान कार्यरत अधिकाऱ्यांना जाब विचारत चांगलेचधारेवर धरले. या सर्व प्रकाराचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली. तर दुसरीकडे चेक पोस्टवरील कर्मचारी आणि दलालांच्या माध्यमातून वाहन चालकांकडून बेकायदेशीररित्या पैसे उकळले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकारावर खा. प्रशांत पडोळे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत ‘सामान्य नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांची लूट सहन केली जाणार नाही, असा इशारा देत ठोस कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची कणा मानले जाणारे ट्रक चालक आज सर्वाधिक शोषणाला सामोरे जात असल्याचे चित्र आहे. या अन्यायाविरोधात खा. प्रशांत पडोळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसद परिसरात आंदोलन करून लक्ष वेधले. दरम्यान आरटीओच्या नावाखाली होणारी मनमानी, बेकायदेशीर वसुली आणि अनावश्यक दबाव याविरोधात जनप्रतिनिधींनी तीव्र निषेध व्यक्त करत गुंडागर्दी चालणार नाही, अन्याय स्वीकारला जाणार नाही. अशी भुमिका घेत निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *