LatestNewsगोंदियाविदर्भ

DHO Gondia : डिएचओच्या मानांकनात गोंदिया राज्यात टॉप फाईव्हमध्ये

आरोग्य निर्देशांक रँकींग मध्ये राज्यात गोंदियाने घेतली भरारी
डिएचओ रँकींग मध्ये राज्यात गोंदियाने पटकावले चौथे स्थान
जिल्हा आरोग्य विभागाचे सांघिक कामामुळेच जिल्ह्याचे नावलौकीक

गोंदिया : डिएचओच्या मानांकनात गोंदिया राज्यातल्या टॉप फाईव्हमध्ये आणि आरोग्य विभागाच्या (DHO Gondia ) नागपुर परिमंडळात दुसरे स्थान पटकावले आहे.
दर महिन्याला राज्यस्तरावरुन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे विविध आरोग्य कार्यक्रम निर्देशांक उद्दिष्टे पुर्ण केल्यामुळे आरोग्य मानद गुणानुसार रँकीग केली जात असते.राज्यस्तरावरील माहे ऑक्टोंबरच्या आरोग्य निर्देशांक रँकींग मध्ये डिएचओच्या मानांकनात राज्यात गोंदियाने भरारी घेतली असुन राज्यात गोंदियाने चौथे स्थान पटकावले आहे आणि आरोग्य विभागाच्या नागपुर परिमंडळात दुसरे स्थान पटकावले.
माता व बालक आरोग्य,कुटूंब नियोजन,किशोरवयीन आरोग्य,विविध लसीकरण, आरसीएच ऑनलाईन पोर्टल नोंदणी,क्षयरोग कार्यक्रम,आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी अंतर्गत मोफत विविध तपासण्या अशा नियमित आरोग्य उपक्रम व राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांची जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेने मोफत अंमलबजावणी केली आहे.त्यामुळे डिएचओच्या मानांकनात गोंदिया राज्यातल्या टॉप फाईव्हमध्ये आणि आरोग्य विभागाच्या नागपुर परिमंडळात दुसरे आले आहे.आरोग्य क्षेत्रात हे मानांकन महत्वाचे आणि मानाचे मानले जाते.
(DHO Gondia ) जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्र, 01 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 263 आरोग्य उपकेंद, 4 आपला दवाखाना व 17 नागरी आरोग्यवर्धीनी उपकेंद्रांर्तगत सेवा देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने राष्ट्रीय कुटूंब नियोजन अभियान,विविध लसीकरण मोहिमा,आरोग्य संस्थांमध्ये सुरक्षित प्रसुती, प्रसुतीनंतरचा व अगोदरचा फालोअप,आपत्कालिन काळात 108 तसेच 102 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे,प्रधानमंत्री सुरक्षित मातृवंदन अभियानाची अंमलबजावणी यावरुन राज्य पातळीवर सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे मानांकन केले जाते.
या मानांकनात गोंदियाचे जिल्हा आरोग्य प्रशासनाचे कामकाज राज्यातल्या पहिल्या पाचमध्ये म्हणजे चौथ्या स्थानावर आहेत.तर आरोग्य विभागाच्या नागपुर परिमंडळात दुसरे स्थान पटकाविले आहेत.या यादीत 63.30 गुणांसह धाराशिव पहिल्या स्थानावर,62.27 गुणांसह अकोला दुसऱ्या स्थानावर,59.15 गुणांसह चंद्रपुर तिसऱ्या स्थानावर,56.91गुणांसह गोंदिया चौथ्या,आणि 56.25 गुणांसह बुलढाणा पाचव्या क्रमांकावर आहे.पहिल्या पाच टॉपमध्ये येण्यासह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या नागपुर परिमंडळात दुसरा क्रमांक पटकावला आहे.चंद्रपुर नागपुर विभागात पहिल्या स्थानी असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे. (DHO Gondia ) विविध आरोग्य उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या रँकींगमध्ये मिळालेले स्थान हे आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे आहे.उत्तम प्रथमोपचारासह सर्व राष्ट्रीय आरोग्य उपक्रम यशस्वी राबविण्याचा आरोग्य विभागाचा कायम प्रयत्न राहणार आहे.
जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची जिल्हास्तरीय समन्वय समिती जिल्हाधिकारी प्रजीत नायर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असते.तालुकास्तरीय विविध सभा घेण्यात येऊन आरोग्य कार्यक्रमावर ठोस नियोजन करण्यात येत असते. (DHO Gondia ) जिल्हास्तरिय अधिकारी यांनी तालुकास्तरीय आढावा सभेसोबतच प्रत्यक्ष प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जावुन सभा घेण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या विविध राष्ट्रीय आरोग्य निर्देशांकावर सुधारणा करण्यावर भर देण्यात येतो. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाबाबत महिनानिहाय मासिक सभा,ऑनलाईन बैठका घेऊन दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिलेल्या सूचना कामी येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या प्रसंगी म्हटले आहे. सदर मानाकंन हा गोंदिया जिल्ह्यातील सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी कार्यक्षेत्रात त्यांनी केलेल्या सांघिक कामगिरीमुळेच मिळाल्याचे डॉ.गोल्हार यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी यांचे पर्यवेक्षण आणि गाव पातळीवरचे सैनिक आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट, सामुदायिक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका, आशा गट प्रवर्तक यांनी लोकांना गुणात्मक सेवा दिल्याने व त्या कामांचे अहवाल करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर,तालुका स्तरीय कर्मचारी,राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कार्यक्रम समन्वयक,जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांनी उत्तम प्रकारे कामगिरी केल्याने जिल्ह्याची रँकिंग राज्यात चौथ्या क्रंमाकावर आले असल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी म्हटले आहे.

भविष्यकाळात प्रभावीपणे सेवा देण्यावर भर
गोंदिया जिल्हा भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या सीमा लगतचा शेवटचा जिल्हा आहे. आदिवासी,नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त सीमा अशी जिल्ह्याची ओळख आहे.विविध आजार बळावलेले असतात.आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमने सांघिक नियोजनबद्ध कार्यक्रम राबवुन हे यश संपादन केले आहे.आरोग्य विभागाने नियोजन पूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याचे फळ मिळत आहे.आरोग्य यंत्रणेतील सर्व अधिकारी व गाव पातळीवरचे कर्मचारी यांचे सांघिक कामाबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.भविष्यकाळात लोक सहभागातून अजून प्रभावीपणे सेवा देण्यावर आमचा भर राहील.आरोग्य व्यवस्थापन व माहिती पद्धती अंतर्गत सर्व माहिती पोर्टलवर विहित कालमर्यादेत भरण्यावर जोर देण्यात येणार आहे.

  • एम.मुरुगानंथम,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया
Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *