रेशन दुकानदाराची मनमानी होणार बंद
गोंदिया : राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत बदल झाला आहे. या व्यवस्थेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा विभागाने नुकताच निर्णय घेतला आहे. आता रेशन दुकानामध्ये राशनची माहिती घरबसल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार असल्यामुळे रेशन दुकानदाराची मनमानी बंद होणार आहे.आतापर्यंत जी व्यवस्था होती त्या माध्यमातून रेशन दुकानात भेट दिल्यानंतरच नागरिकांना पुढील महिन्याचे धान्य मिळणार की नाही आणि मिळणार असेल तर किती प्रमाणात मिळणार याची माहिती मिळत होती. मात्र, ही व्यवस्था आणखी फायदेशीर बनविण्यासाठी नागरिकांना रेशन दुकानात जाण्यापूर्वीच सगळी माहिती त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. ही प्रणाली नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. अनेक लाभार्थ्यांना याचे उचल मिळाले आहेत. या नवीन एसएमएस सेवेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला धान्यवितरणापूर्वी एक मॅसेज पाठवला जाणार आहे. या मॅसेजमध्ये नागरिकांना मिळणार्या धान्याचा प्रकाराची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत दिल्या जाणार्या धान्याचे संपूर्ण पालन होत असल्याची माहिती देखील संदेशात उपलब्ध राहणार आहे.नागरिकांना धान्य मिळाले आहे की नाही याची अपडेटेड माहिती सुद्धा एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. यामुळे धान्य वितरणातील अनियमितता कमी होण्याची शक्यता वाढली आहे. पुरवठा विभागाने तक्रारीच्या नोंदीसाठी टोल प्रâी क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या टोल प्रâी क्रमांकावर नागरिकांना धान्य वितरण संदर्भातील तक्रारी नोंदवता येतील. नागरिक धान्य वितरणाबाबत कोणतीही अडचण, संशयास्पद व्यवहार किंवा संदेश न मिळाल्यास या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. एसएमएस सेवा फक्त त्या लाभाथ्यर्थ्यांना मिळेल ज्यांनी त्यांचा मोबइल क्रमांक त्यांच्या रेशनकार्डशी लिंक केला आहे.
—————
बनावट नोंदी त्वरित उघड होऊ शकतात
संदेश न मिळाल्यास किंवा माहिती पडताळून पाहण्याची आवश्यकता असल्यास लाभार्थी मेरा रेशन अॅपवर आधार क्रमांक टाकून मंजूर धान्य कोटा आणि प्रत्यक्ष मिळालेल्या धान्यातील फरक सहज तपासू शकतात. यामुळे अनियमित वितरण, जादा कपात किंवा बनावट नोंदी त्वरित उघड होऊ शकतात. पुरवठा विभागाने काही तांत्रिक अडचणी मान्य केल्या आहेत. काही लाभार्थ्यांना चुकीचे संदेश मिळाल्याच्या तक्रारी नोंदल्या गेल्या असून त्यावर प्रणालीमध्ये सुधारणा सुरू आहे. कोरपना तालुक्यात काही महिन्यापासून रेशन कार्डाचे काम प्रलंबित आहे. यामुळे संबंधित अधिकार्याने लक्ष देऊन होणारी नागरिकांची गैरसोय दूर करण्याची गरज आहे.

