LatestNewsगोंदियाविदर्भशैक्षणिक

सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटना शिक्षण संचालकांच्या दारी

संघटनेचे जिल्हाध्यक्ष विधाते व खोब्रागडे यांनी घेतली भेट
गोंदिया :
सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, आरोग्य कर्मचारी व इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अंशराशीकरण, उपदान, संघणक वसुली रक्कम व इतर थकबाकीकरीता जिल्हा स्तरावर निधी नसल्याचे सांगून मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍याकडून लाभापासून वंचित ठेवले आहे. परिणामी अनुदानाचा तिढा मार्गी लागून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना न्याय मिळावा, याकरीता १५ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष खोब्रागडे व चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष विधाते यांनी शालेय शिक्षण संचालक गोसावीr यांची भेट घेवून समस्या मांडल्यात. यावर संचालक गोसावी यांनी सकारात्मक भुमिक घेत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी सतत प्रयत्नशील असते. परंतु, मागील काही महिन्यांपासून सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक, मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, आरोग्य कर्मचारी व इतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अंशराशीकरण, उपदान, संघणक वसुली रक्कम व इतर थकबाकीकरीता जिल्हा स्तरावर निधी नसल्याचे सांगून टाळाटाळ केली जात आहे. परिणामी सेवानिवृत्त कर्मचारी बंधू -भगिनींना लाभासाठी पायपीट करावी लागत आहे. या प्रकाराला घेवून गोंदिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल.यु.खोब्रागडे व चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष गणपत विधाते यांनी १५ डिसेंबर रोजी पुणे येथील शालेय शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान संचालक गोसावी यांच्यासोबत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या प्रलंबित समस्यांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे निवडश्रेणीचा लाभ सरसकट देण्यात यावा, अशी मागणी केली. जिल्हा व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पूर्वी प्रमाणे वेतनवाढ लावून थकबाकी देण्यात यावी, अशी मागणी केली असता आता रोख रक्कम देणे सुरु केल्यामुळे वेतनवाढ बंद केल्याचे गोसावी यांनी सांगितले. तर इतर मागण्यांना घेवून संचालक शरद गोसावी यांनी सकारात्मक भुमिका घेत पुढील महिन्यापर्यत सर्व जि.प.ला सुचना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Spread the News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *