Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) : स्थानिक स्वराज्य संस्थांचे पुढील सर्व निवडणूक शिवसेना (उबाठा) स्वबळावर लढणार
शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी पत्र परिषदेत दिली माहिती
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात त पुढील काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षश्रेष्ठी, पूर्व विदर्भातील संपर्कप्रमुख यांच्या आदेशानुसार शिवसेना (उबाठा) स्वबळावर लढणार असल्याची माहिती गोंदिया जिल्हा शिवसेनाप्रमुख पंकज यादव यांनी शिवसेना जिल्हा कार्यालय येथे रविवार ५ ऑक्टोंबर रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून दिली. यासंदर्भात अधिकची माहिती देताना शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज जाधव म्हणाले की आमच्या पक्षातर्फे गोंदिया जिल्ह्यात राजकीय सर्वेक्षण करण्यात आले आणि त्यानुसार तसेच आम्ही मागील पाच वर्षात केलेल्या पक्ष बांधणी यानुसार Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) च्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे वरिष्ठ नेते आमदार भास्कर जाधव आणि गोंदिया जिल्ह्यातील संपर्कप्रमुख बाबा ठाकूर यांच्या आदेशानुसार या सर्व बाबी लक्षात घेता गोंदिया जिल्ह्यात पुढील काळात होणाऱ्या गोंदिया नगरपरिषद, तिरोडा नगरपरिषद, गोरेगाव नगरपंचायत तसेच पुढील काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुक ,पोट निवडणूक आदि सर्व निवडणुका Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) स्वबळावर लढण्याची पक्षाद्वारे तयारी करण्यात आली आहे याकरिता पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या वार्डातून उमेदवारी करिता अर्ज सादर करण्याचे आव्हान ही याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी केले आहे. गोंदिया नगर परिषदेतील अध्यक्षपदाची निवडणूक सह संपूर्ण 42 वार्डातील जागेवर शिवसेना (उबाठा) आपले उमेदवार उभे करणार आणि गोंदिया नगर परिषदेवर भगवा फडकविणार असल्याचेही शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज जाधव याप्रसंगी म्हणाले.
पत्रकार परिषदे ला गोंदिया जिल्हा शिवसेनाप्रमुख पंकज यादव चुनेश पाटले , तालुका प्रमुख गोंदिया, सौरभ बोरकर दलित आघाडी शहर, रुपाली रोटकर – महिला सेना सहसंयोजक, झुबेर खान शहर उपप्रमुख, विक्की बोमचेर – जिल्हा उपप्रमुख युवासेना, विजय रहांगडाले -तालुका समन्वयक, अजय मिश्रा शहर समन्वयक,कविता चौहान – महिलाआघाडी, कपिल नेवारे- शाखाप्रमुख, तालुका प्रमुख युवासेना दुर्गेश किरनापुरे, देवानंद येरणे उप तालुका प्रमुख गोरेगाव, रोहित येरणे उप तालुका युवासेना गोरेगाव, सागर सिक्का गोंदिया शहर उपप्रमुख, अशोक आर्खेल आदि उपस्थित होते.

