२३ ते ३० ऑगस्टदरम्यान छत्तीसगड मार्गावरील २६ गाड्या राहणार रद्द
बिलासपूर-झारसुगुडादरम्यान चौथ्या लाइनचे काम सुरु

गोंदिया (Gondia): बिलासपूर रेल्वे मंडळाअंतर्गत बिलासपूर-झारसुगुडा विभागात तिसर्या व चौथ्या रेल्वे जोडणीचे काम केले जाणार आहे. यासाठी २३ ते ३० ऑगस्टदरम्यान छत्तीसगडवरून जाणार्या २६ गाड्या रद्द राहणार आहेत. याचा महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात, राजस्थान, बिहार आणि तेलंगणाला जाणार्या प्रवाशांना फटका बसणार आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले आहे तर काही स्टेशनपर्यंतच चालविण्यात येणार आहे.
बिलासपूर (Railway) रेल्वे मंडळाने रद्द केलेल्या २६ गाड्यांमध्ये १८११३ टाटानगर-बिलासपूर एक्स्प्रेस २३ ते २६ ऑगस्ट, १८११४ बिलासपूर-टाटानगर एक्स्प्रेस २४-२७ ऑगस्ट, २०८२२ सांतरागाछी-पुणे एक्स्प्रेस २३ ऑगस्ट, २०८२१ पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेस २५ ऑगस्ट, १२८७० हावडा-मुंबई एक्स्प्रेस २२ ऑगस्ट, १२८६९ २४ मुंबई-हावडा एक्स्प्रेस ऑगस्ट, १७३२२ जसीडीह-वास्को-द-गामा एक्स्प्रेस २५ ऑगस्ट, १७००५ हैद्राबाद-रक्सोल एक्स्प्रेस २१ ऑगस्ट, १७००६ रक्सोल-हैद्राबाद एक्स्प्रेस २४ ऑगस्ट, १२१०१ कुर्ला शालीमार एक्स्प्रेस २३, २५, २६ ऑगस्ट, १२१०२ शालीमार-कुर्ला एक्स्प्रेस २५, २७, २८ ऑगस्ट, रायगड-बिलासपूर मेमू २४-२७ऑगस्ट, रायगड-बिलासपूर मेमू २४-२७ ऑगस्ट, गोंदिया-झारसुगुडा-गोंदिया पैसेंजर २४-२७ऑगस्टदरम्यान रद्द राहणार आहेत. या गाड्या रद्द असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.